मानव हा जगाच्या पाठीवरचा बुध्दीमान प्राणी आहे. आणि मनात आणले ते प्रत्यक्षात उतरवित प्रयागराज येथील शैलेंद्र गौर यांनी 18 वर्षाच्या अथक व सातत्यपुर्ण परिश्रमानंतर इंजिनची निर्मीती केली आहे. तर या निर्मीतीच्या माध्यमातुन देशाच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच फायदा होईल अशा चर्चा आता प्रसारमाध्यमातुन होवू लागल्या आहेत.
प्रयागराज येथील शैलेंद्र गौर यांनी १८ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एक नाविन्यपुर्ण संशोधन केले अाहे सहा-स्ट्रोक इंजिन जे ऑटोमोबाईल्सचे भविष्य बदलू शकते. असा विश्वास त्यांच्या कर्तव्यतत्परतेला असल्याचे बोलल्या जाते.
ही बातमी वाचा –नव पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणारे श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळ
या इंजिनची वैशिष्टये-
सुपर मायलेज – फक्त १ लिटर पेट्रोलवर १७६ ते २०० किमी चालते. मल्टी-फ्युएल इंजिन – वेगवेगळ्या इंधनांवर चालू शकते, अधिक लवचिकता देते. पर्यावरणपूरक – जवळजवळ शून्य प्रदूषण निर्माण करते, ज्यामुळे ते पर्यावरणासाठी उत्तम बनते.
पेट्रोल वापरावर येणार नियंत्रण
पेट्रोलच्या किमती वाढत असताना आणि प्रदूषण ही एक मोठी समस्या असताना, हा शोध स्वच्छ आणि स्वस्त भविष्याची आशा आणतो. शैलेंद्रचा प्रवास दाखवतो की संयम, चिकाटी आणि दूरदृष्टीने, एक व्यक्ती मोठा फरक करू शकते.
हे फक्त एक इंजिन नाही – ते भारतीय नाविन्यपुर्ण आणि कधीही हार न माणनाऱ्यांच्या शक्तीचे प्रतीक आहे.
तरी या संशोधनामुळे देशातील विशेषतः दुचाकी वाहनधारकंासाठी हा नाविन्यपुर्ण उपक्रम नक्कीच फायदा ठरेल आणि पेट्रोल वापराच्या बचतीमुळे नक्कीच देशाचे हित जोपासल्या जाईल असे म्हणणेे वावगे ठरणार नाही.
