President of India

शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना निमंत्रण

Ø  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

बुलढाणा, दि. 11 : संतनगरी शेगाव येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय  आरोग्य महामेळाव्याच्या  उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भातील निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना केंद्रीय आयुष  (स्वतंत्र प्रभार)  आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात स्नेहपूर्वक भेट घेऊन दिले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जिल्ह्यातील शेगाव येथे नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय  महाआरोग्य मेळावा  आयोजित करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय  महाआरोग्य मेळाव्याचे  उद्घाटन  राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी विनंती गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु  यांच्यासोबत  आयुर्वेद आणि आरोग्य या विषयावरही चर्चा केली. आयुष मंत्रालयातर्फे आयोजित या राष्ट्रीय पातळीवरील या महा आरोग्य मेळाव्याचे  प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी या भारतीय पारंपरिक पद्धतींची समृद्ध परंपरा, वैज्ञानिक भक्कम पाया आणि जनकल्याणकारी स्वरूप जनतेसमोर सादर करणे होय.

 

ही बातमी वाचा –तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

 

राष्ट्रीय महाआरोग्य मेळावा  2025 ची ठळक वैशिष्ट्ये:

 

1.प्रतिबंधात्मक, प्रोत्साहक आणि उपचारात्मक आरोग्यातील आयुष प्रणालींचे प्रदर्शन

2.सार्वजनिक आरोग्य जागरूकता आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार

3.संशोधन व ज्ञान विनिमय यासाठी विद्वान, संशोधक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना व्यासपीठ

4.उद्योग व उद्योजकता संधी — औषधी वनस्पती उत्पादक,

5.एमएसएमइ आणि स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन

6.विशेष चर्चासत्रे — राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांत आयुष समन्वय, फिट इंडिया मूव्हमेंट, पर्यावरणपूरक आरोग्यसेवा, पारंपरिक औषधज्ञान संवर्धन

बुलढाणा हा जिल्हा  राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन्मभूमी आणि संत गजानन महाराजांची यांची समाधीभूमी, तसेच जागतीक दर्जाचे  लोणार सरोवरासारख्या अनोख्या नैसर्गिक वारशा असलेली भुमी आहे  येथे ऐतीहासीक ,अध्यात्म, परंपरा आणि विज्ञान यांचा संगम साधणारे हे ठिकाण या राष्ट्रीय महाआरोग्य सोहळ्यासाठी सर्वोत्तम स्थळ आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरेल,” असा विश्वास केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.

Scroll to Top