नागपुर- पुणे वंदे भारत ट्रेनच्या वेळ,तिकीट दरावरुन प्रवासी संघटना टीकेच्या भुमिकेत..

रेल्वे विभागाच्या वतीने 10 ऑगस्ट 2025 रोजी देशभरातील अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत, त्यामध्ये नागपुर-पुणे वंदे भारत ट्रेन चा समावेश आहे. त्यामुळे या वंदे भारत एक्सप्रेसचा सुरु कऱण्याबाबत सत्ताधाऱ्यांकडून श्रेय घेण्याचे काम सद्या प्रसारमाध्यमातुन होत आहे. तरी उद्यापासून सुरु होणाऱ्या या वंदे-भारत ट्रेनच्या अडचणी व आरोपांचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव्य आता चर्चेत येवू लागले अाहे. खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या यंत्रणेला सोेयीचे वेेळ ठेवल्याचाही अारोप आता या संभाव्य गाडीवर प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
अनेक दिवसापासून या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरु होणार असल्याच्या बातम्यामुळे अनेकांना प्रतिक्षा असलेल्या या ट्रेनला 10 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे.

 

परंतु ही गाडी सुरु होण्याअगोदरच अयोग्य वेळ आणि जास्त असलेल्या तिकीटदरामुळे तसेच स्लिपर कोच च्या अभावामुळे या ट्रेन बाबत प्रवास संघटनेच्या वतीने आरोप प्रत्यारोप वाढीस लागले आहेत. तसेच या एक्सप्रेस च्या वेळापत्रकामुळे खाजगी बस च्या लॉबीला फायदा पोहचविण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाच्या वतीने गैरसोय निवडल्याचा आरोप आता प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात येवू लागला आहे. या गाडीची वेळ नागपूरवरुन सकाळी 9.50 ला सुटून पुण्यात रात्री 9.50 पोहचणार असल्याने दिवसाचा 12 तासाचा प्रवास आणि तो केवळ बसुन करणे प्रवाश्यांना त्रासदायक होत असल्याचा आरोप आता प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात येवू लागला आहे.

 

 

एवढेच नव्हे तर या एक्सप्रेस मध्ये स्लीपर ची सुविधा नसतांना सुध्दा या पुर्वी या मार्गावर सुरु असलेल्या हावडा- पुणे दुरंतो एक्सप्रेस च्या तुलनेमध्ये नव्याने सुरु होणाऱ्या वंदे भारत ट्रेन चे तिकीट सुध्दा वाढीव असल्याचे बोलल्या जात आहे.
सणासुदीच्या काळात खाजगी बस सेवा अव्वाच्या सव्वा दर आकरणी करतात त्याच्या व्यवसायाला सहकार्य करण्याचा जणु उद्देशच रेल्वे विभागाचा असावा या भुमिकेतुन रेल्वे विभागाने वंदे भारत ची वेळ गैरसौयीची ठेवल्याचे टीकास्त्र प्रवासी संघटनेकडून टाकण्यात आले आहे.

Leave a Comment