महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मागील 5 दिवसापासून महाराष्ट्राची राजधानी येथे मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीकरीता आंदोलन छेडण्यात आले हाेते. एक दिवसाकरीता मिळाले होते. परंतुु मुंबईत लाखो आंदोलक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले होते.
येथे आलेल्या आंदोलकांना अन्न वस्त्र निवारा मिळावा याकरीता आंदोलकांना अन्नदान करण्याकरीता मुंबईकर आणि मुंबईतील विविध समाजांच्या वतीने समाज मंदीरे सुध्दा खुली करुन दिली.
ही बातमी वाचा –Breaking News तरच..रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो – शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द
तर या आंदोलनाचे वैशिष्टये म्हणजे शिस्तबध्दता हे जरी असले तरी आज पाचव्या दिवशी राज्य सरकारने मागण्या मान्य करीत आंदोलक मनोज जरंगे यांच्या आंदोलनाचा सकारात्मक समारोप केला. या प्रसंगी या ठिकाणी सर्व आंदोलनास पाठींबा देण्याकरीता आलेल्या समाज बांधवांना शासनाच्या आदेशाची प्रत वाचून दाखवित मनोज जरंगे यांना तमाम मराठा बांधवांनी होकार दिल्यानंतर माघार घेतली. आणि रात्री 9 नंतर मुंबई खाली करतो असा शब्द प्रशासनाला दिला.
तरी हे आंदोलन म्हणजे मराठाचा समाजाचा हक्क असे असल्याने अनेकांनी या आंदोलनात सहभागी आंदोलकांना आणखी दोन दिवस पुरेल इतका अन्नसाठा पाठवून दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या या आंदोलनाकरीता सर्वोतोपरी विविध समाज घटकंाचा पाठिंबा तर होताच उलट मदत करतांना सुध्दा मराठा समाजातील आंदोलक बांधवांची उपासमार होवू नये याकरीता अनेक दानदात्यांनी मोठ्या प्रमाणात अन्न व मदतीच्या वस्तु पुरविण्याकरीता कुठलीच कसर सोडली नाही.
तरी आता आंदोलक समितीच्या वतीने आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर कळविण्यात आले आहे की, सदर आंदाेलकांना आणखी दोन दिवस पुरले इतका अन्न साठा हा आझाद मैदानावर आहे. तर आंदोलकांसोबत मुंबईतील मराठा समाजाला सुध्दा आणखी दोन दिवस पुरेल असा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातुन व्हायरल होत आहे.
