महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मूंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरंागे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस होता.
न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाच्या वतीने उपोषण हलविण्याबाबत निर्देश देण्यात आले असले तरी राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी केलेल्या उपसमितीची बैठक संपन्न झाली
ही बातमी वाचा –शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे
मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्याकरीता स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष राधकृष्ण विखे पाटील व इतर सदस्यांनी आंदोलक मनोज जरांगे यांची आझाद मैदानावर जावून भेट घेतली. त्यावेळी उपसमितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मराठा आरक्षणाबाबतचा राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आलेला आदेश जरांगे यांनी सर्व आंदोलकांसमोर वाचून दाखवला.
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारच्या वतीने मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी यावेळी केली.उपसमितीच्या वतीने हैदराबाद गॅझेटबाबतची अधिसूचना काढताच रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो असं आश्वास न मनोज जरांगे यांनी विखे पाटील यांना दिले.
