Election of Shegaon Nagar parishad

प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस

राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबतचे निर्देश दिल्याबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलीक प्रभाग प्रारुप रचनेची यादी प्रकाशित केले आहे. तरी प्रभागाच्या पाडण्यात आलेल्या सिमा व असलेल्या माहितीबाबत हरकती व सुचना मागविल्या आहेत. तरी स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी हरकती व सुचना नोंदविण्यासाठी शासनाच्या वतीने शेवटची 30 ऑगस्ट 2025 ही तारीख निश्चीत केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ही बातमी वाचा –लाडकी बहीण योजना- योजनेतील या बहीणींवर शासनाकडून कारवाईचा बडगा

 

तरी होणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर शासनाकडून निश्चीत केलेल्या प्रभाग रचनेबाबत काही हरकती असल्यास त्या 30 ऑगस्ट पर्यंत नोंदविण्याचे निर्देश असल्याने आपल्या प्रभागातील असलेल्या सिमा या नक्की आपणास निवडणुकीच्या दृष्टीने योग्य आहेत वा शासनास कोणत्या सुचना करावयाच्या याबाबत तर्क वितर्क लढवित यावर कोणत्या निकषानुसार हरकती व सूचना नोंदविता येईल त्याचा येणाऱ्या काळात आपल्याला फायदा होईल याची तपासणी करण्यात मशगुल अाहेत.

शेगांव शहरात एकुण प्रभाग 15

नव्याने वाढलेल्या नागरी वस्त्यांचा समावेश करता यावेळी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकुण 15 प्रभाग पाडण्यात आले आहेत. तरी आता यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये 30 नगरसेवक यावेळी नगर पालिकेत जाणार आहेत. तरी आपल्या प्रभागात काय सुचना प्रकाशित यादीवर कराव्यात याचा अभ्यास करीत आहेत.

 

शेवटच्या 4 दिवसात हद्दवाढी बाबतच्या हरकती नोंदविल्या जाणार

अनेक प्रभागात हद्दवाढ झाली असुन सिमा आखतांना शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा आता रंगु लागल्या असल्या तरी याबाबत दि.30 ऑगस्टपर्यंत नेमक्या कोणत्या हरकती नोंदविल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे हे विशेष

Scroll to Top