आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी!

स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्ष आणि नगरसेवक हा जनसामान्यांशी जोडणारा महत्वपुर्ण दुवा असतो. परंतु आता या दुव्याला आगळेवेगळे वळण लागल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे. त्याची प्रचिती शेगांवकरांनी मागील पाच वर्षाच्‍ाा सत्ताकाळ उपभोगल्यानंतर सत्ताधारी असलेल्या लोकप्रतिनिधी यांची भुमिका आणि विरोधात असलेल्या लोकप्रतिनिधी यांच्या कार्यप्रणालीचे अनुकरन करणे गरजेचे असल्याचे दिसून आले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

सत्ता मिळविण्याकरीता आणि लोकप्रतिनिधीत्व मिळविण्याच्या दृष्टीने आता ईच्छुकांना नगरसेवक पदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे ज्या पक्षासोबत जुळलेले आहेत. त्या पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रभागात त्यांना उमेदवारी आहे. आणि आता स्वतःच्या नावाची घोषणाबाजी करीत स्वयंघोषित नगरसेवक होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हे वास्तव्य आता शेगांवकर अनुभवत आहेत. कधी काळी काही राजकारण्यांचे दाखले देण्यात येत असत की, जनतेने दिलेला प्रतिनिधी हा खरा नगरसेवक परंतु आजस्थितीला जनतेच्या मनात असलेला लोकप्रतिनिधी हा निवडणुकीच्या रिंगणात टिकु शकत नाही.

 

ही बातमी वाचा –त्वरा करा; अन्यथा पॅन होणार निष्क्रिय..

 

कारण आज विकास म्हणजे सत्ता असलेल्या पक्षाचा उमेदवार हे समीकरण चर्चेत आणले जाते. आणि राजकीय पक्षांकडून उभ्या केलेल्या उमेदवाराला सर्वोतोपरी पाठबळ दिल्या जाते. त्यांची त्या परिसरातील नागरिकांच्या समस्यांशी कुठलेच देणेघेणे नाही याबाबतची वास्तविकता शेगांवकरांनी मागील सत्तेच्या कार्यकाळात अनुभवली आहे. सत्ताकाळामध्ये  नगरसेवक पद मिळवितांना करत असलेला प्रचार हा जनसेवक असा असला तरी नगरसेवक पदाचं घोंगड अंगावर आल्याबरोबर तो आर्थिक स्त्राेत वाढविण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत असतो. त्यासाठी न.प. शी संबधित  असलेल्या विकासकामात कंत्राट घेण्याच्या शर्यतीतला तो प्रथम कर्ता ठरतो. याची वास्तविकता नाकारता येत नाही. आणि आता नगरसेवक कसा असावा असा जनतेची हाक ऐकुन घेण्यास आता राजकीय पक्षांना सुध्दा वेळ उरलेला नाही. तर अनेकांना प्रतिष्ठेसाठी नगरसेवक पद अपेक्षित आहे.

 

तर जनतेच्या मनात  अपेक्षीत असलेल्या नगरसेवकाची प्रतिमा आता पुसण्याचे काम हे मोठ्या स्तरावर झाले असल्याचे वास्तव्य आता समोर आले असले तरी आपल्या पक्षाच्या विचारधारेचा, आपल्या समाजाचा व आपल्या जवळचा नगरसेवक अशी ख्याती आता नगरसेवक पदाची झालेली आहे.  नगरसेवक पद आणि प्रभागातील नागरिकांच्या गरजा याचे समीकरण जुळविणारा खरा नगरसेवक असे समीकरण आता लयास गेल्याचे वास्तव्य पहावयास मिळते. एवढेच नाही तर या प्रभागातील यांनी आपल्याला मत दिले नाही. त्यामुळे त्या परिसरातील व त्याच्या घरासमोरील कामे करायची नाही. अशाही नगरसेवकांची मोठी फळी शेगांवकरांनी अनुभवली आहे. त्यामुळे स्वयंघोषित वा पक्षाने दिलेला नगरसेवक आणि जनतेच्या कामाकरीता अपेक्षित असलेला  नगरसेवक यांचे संतुलन लयास गेलेले आहे.

 

नगराध्यक्ष वा  नगरसेवक निवडीबाबत आता जनतेच्या कुठल्याच अपेक्षा ऐकुन घेतल्या जात नाही. तर आता पक्षाने त्यांच्या मर्जीतल्या उमेदवाराला नगरसेवक पदाची संधी दिल्यास जनतेला त्यावर शिक्कामोर्तब कराण्याशिवाय  पर्याय  उरत नाही. आणि नंतर हे नगर सेवक फक्त प्रतिष्ठेसाठी आणि ठेकेदारीसाठीच उरतात अस वास्तव्य आतापर्यंत तरी पहावयास मिळालं असले तरी येणाऱ्या काळात जनता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

कायद्याचं ज्ञान असणारा, शिक्षीत  असून योजना अंमलबजावणीसाठी तत्पर असणाऱ्या नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी कोणही नागरिक पुढाकार घेत नाहीत आणि शेवटी पाच वर्षे पक्षाच्या ध्येयधाेरणानुसार निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या आसऱ्यावर विसंबुन राहण्याशिवाय पर्याय उरत नाही हे विशेष.

Scroll to Top