Election

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन रखडलेल्या निवडणुकाबाबत सुप्रिम कोर्टाने  निवडणुक आयोगाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीबाबत व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयाची वाट मोकळी करुन दिल्याबरोबर निवडणुक आयोग सुध्दा राज्यात कामाला लागले आहे. तरी येणाऱ्या काळात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून बुलढाणा जिल्हयात निवडणुक आयागोच्या वतीने भौगोलिक प्रारुप प्रभाग रचना ची माहिती प्रसिध्द केल्यामुळे शेगांव शहरात कधीही संपर्क नसलेल्यांना अनेक वार्डातुन निवडणुक लढविण्याचे डोहाळे लागले असून आता त्यांना निवडणुक लढवून नगर पालिकेत प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न बाळगल्याचे वातावरण पहावयास मिळत आहे. एवढेच नाही तर कधीही जनतेशी जनसंपर्क न ठेवता फक्त प्रसारमाध्यमातुन  व सोशल मिडीयातुन नेहमीच हवेत असणाऱ्यांनी सुध्दा आपली इच्छा प्रबळ करीत नगरसेवक होणार असल्याची दावेदारी व्यक्त करीत हालचाली सुरु केल्या आहेत.

ही बातमी वाचा –मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द!

तरी आता होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच प्रभाग रचनेबाबत असलेल्या हरकती व सुचना देण्याकरीता जिल्हा प्रशासनाने दि. 30 अॉगस्ट पर्यंतची मुदत दिली असली तरी आता यावर कोण आक्षेप नोंदविते याकडे पाहणे गरजेचे आहे.

नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कधी काळी कुणाचाही संपर्क न ठेवणाऱ्यांना सुध्दा आता ही निवडणुक महत्वाची वाटू लागली असल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या धामधुमीत जनसमान्यांसोबत तसेच त्या प्रभागात फिरत असतांना आपण सुध्दा  या प्रभागातुन निवडणुक लढण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा त्यांनी त्याकाळापासून सुरु केल्या होत्या. या जरी दबक्या आवाजात असल्या तरी होणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी करीत आपणास इच्छुक  प्रभागातुन तिकीट मिळावं याकरीता उकळ्या  फुटत असल्याचे वास्तव्य ते स्पष्टपणे  दाखवू शकत नाहीत हे पण नाकारता येत नाही. तरी आता शेगांव शहरातील राजकीय परिस्थीती पाहता वरदहस्ताशिवाय आपणास संधी मिळणार नाही हे हरुन त्यांनी सुप्त अवस्थेत कामे गतीमान केल्याचे वास्तव्य आहे.

 

त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवक पदाकरीता वाटेल ते करण्याची तयारी  सद्या इच्छुकांच्या माध्यमातुन सुरु असली तरी राजकीय पक्षाचे पक्षश्रेष्ठी वा जानकार नेते यांचे अवलोकन करण्यात तत्पर असल्याची वास्तविकता नाकारता येत नाही.

 

मागील पाच वर्षाच्या कालावधीत पक्ष आणि पक्षाकरीता असलेले योगदान याची गोळाबेरीज करता  व झालेल्या लोकसभा आणि विधानसभा काळात त्या पदाधिकाऱ्यांनी त्या प्रभागात काय दिवे लावले. कामाच्या बाबतीत काय प्रामाणिकता होती. याचे सुध्दा मोजमाप झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता जुन्या नेत्यांना वगळुन नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी मिळणार का असा सवाल सुध्दा उपस्थित होत आहे. तरी आता जुन्या व मातब्बरांना सुध्दा  पदाचा मोह सुटला नसला तरी आता होणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांच्या स्पर्धेत अनेक इच्छुक असले तरी नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी पक्ष  कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतो याकडे कानाडोळा करुन चालणार नाही. तरी सुप्त हालचाली  गतीमान झाल्या आहेत.

Comments are closed.

Scroll to Top