महाराष्ट्र राज्यात असलेल्या महायुती शासनाच्या वतीने महीला मतदारांना खुश करीत सत्ता कायम करण्याकरीता मध्यप्रदेशात असलेल्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी ही विधानसभा निवडणुकी अगोदर मोठ्या जोशात केली. तर आचारसंहिता लागणार असल्याने या निवडणुकीच्या अगोदर अग्रीम पैसे हे लाडकी बहीणीच्या खात्यात जमा केले.परंतु महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यानंतर आता या लाडकी बहीण योजनेला कात्री लावण्याचे काम विविध निकषानुसार सुरु करण्यात आले आहे. तरी आता ही योजना विरोधकांकडुन नेहमीच चर्चेत असते.
तरी आता राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेकरीता आता लाभार्थी बहीणींची पडताळणी करण्यासाठी केवायसीच्या माध्यमातुन आधार कार्डची पडताळणी करण्यासाठी केवायसीच्या माध्यमातुन आधार कार्डाची पडताळणी करण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागाने या संदर्भातील आदेश गुरुवारीच जारी केले आहेत.
ही बातमी वाचा –खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं.
पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणीकरण चालू आर्थिक वर्षात 18 सप्टेंबरपासुन दोन महिन्याच्या आत पुर्ण करणे बंधनकारक करण्यात आलं अाहे. अस प्रामाणीकरण न करणाऱ्यावर पुढील कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यापैकी 26 लाख लाभार्थी निकषानुसार पात्र नसल्याचं आढळून आलं आहे. या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी घेतल्याचे उघड झाले होते.
त्यामुळे आता सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. दोन महिन्यानंतर आणखी काही लाडकी बहीणींना या योजनेतुन वगळले जाण्याची शक्यता आहे. लाडक्या बहीणीच्या जोरावर राज्यात महायुतीने सत्ता स्थापन केली असली तरी त्यानंतर त्याचा विसर पडला. अनेकांना हप्ते देणे बंद केले. अनेकांना या योजनेतुन बाद केले. तर आता निवडणुकीच्या अनुषंगाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या हप्त्याची जुळवाजुळव केली जात आहे. पण विधानसभा निवडणुकीपुर्वी ज्यांना लाभ मिळाला.
त्यानंतर त्यांना अपात्र ठरविले आहे. तरी या. निवडणुका झाल्यावर त्यांना बाहेर रस्ता दाखविला जाणार असल्याचे विरोधकांकडून बोलल्या जात आहे. तरी लाडकी बहीणीच्या लाभार्थ्यांच्या संख्या कमी करण्याकरीता नव्याने पडताळणी व निकषांची चाळणी लावण्यात आल्याची चर्चा आहे. तरी आता लाडकी बहीणीला घर घर लागली असल्याचेे ज्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रीया उमटत असल्याचे दिसत अाहे.
तरी आता लाभ घेणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता नव्या निकषाची पुर्तता करावी लागणार आहे एवढे मात्र निश्चीत.