whatsapp image 2025 10 01 at 20.47.36

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक अनुषंगाने हालचाली होवू लागल्या गतीमान

शेगांव- निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचाली गतीमान होत असल्याचे चित्र शेगांवच्या राजकारणात पहावयास मिळत आहे. आता मागील पाच वर्षापासून सत्ताधारी व विरोधक अशी कोणतीच भुमिका नसलेले स्थानिक नेते आता नवा गडी नवा राज या धर्तीवर होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत अ सले तरी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण नेमके कुणाला सुटणार याकरीता प्रतिक्षा संपल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

त्यामुळे अनेकांची घालमेल होत असली तरी नगराध्यक्ष पद हे जनतेतुन  निवडल्या जाणार असल्याने यावेळी मोठ्या पक्षांकडून कुणाला संधी मिळणार यासाठी पायाबांधणी सुरु झाली आहे. तरी आता नगर परिषद च्या हद्द रचनेबाबत असलेल्या हरकतीवर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी व हरकतीबाबत बैठक घेण्यात आली होती. हरकतदारांना सुध्दा तेथे आमंत्रित केले असले तरी शेगांव शहरातील प्रभाागतील दुरुस्तीबाबत अनेकांनी आपल्या हरकती नांेदविल्या होत्या परंतु काल दि. 30 सप्‍टेंबर रोजी शेगांव नगर परिषदेच्या कार्यालयात जाहीरात फलकावर लावण्यात आलेल्या प्रभागनिहाय रचनेत बदल न झाल्याने याबाबत वरिष्ठांकडे म्हणजेच न्यायालयात दाद मागण्यासाठी हरकतदार आपली भुमिका बजाविण्याच्या तयारी आहेत. तरी सद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला सुरुवात झाली आहे.

ही बातमी वाचा –शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर

सद्या शेगांव शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये समस्या व नागरी सुविधांचा अभाव हा सद्या  महत्वपुर्ण विषय ठरला असला तरी शेगांवातील मुलभुत सुविधा देण्याबाबत नगर परिषद प्रशासनाची दिरंगाई होत आहे. कारण सत्ता नसल्याने या ठिकाणी कोणीच लोकप्रतिनिधी कार्यरत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरुन सेवा देत असतांना कुणाचा अंकुश नसल्याने मुलभुत सुविधांचा अभाव हा सद्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर आता मागील 5 ते 6  वेळा नगरसेवक पदाचा पदभार ज्यांनी संभाळला आहे. त्यांना सुध्दा पुन्हा या निवडणुकीच्या रिंगणात आपले अस्तित्व कायम करण्याची तयारी असली तरी नव्या चेहऱ्यांना सुध्दा यावेळी अापल्या प्रभागाचे नेतृत्व करण्याची अभिलाषा उरापोटाशी बांधून कामाला लागल्याचे चित्र आज स्थितीला पहावास मिळत आहे.

 

तरी आता राज्यात निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर आपली सुध्दा पुर्व  तयारी असावी या करीता जनसंपर्क तसेच मतांचा अभ्यास करण्याचा कयास हा प्रत्यक्षात दिसला नसला तरी अंतर्गत हे काम मोठ्या दिमतीने सुुरु असल्याचे नाकारता येत नाही.  तरी निडणुकीच्या धामधुमीत राजकारण्यांची चक्रे गतीमान झाल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे.

Scroll to Top