साहित्याच्या दरांत वाढ
शेगांव प्रतिनिधी
हिंदु परंपरेला अनुसरुन शेतकरी बांधवाचा हा बैल पोळा सण साजरा करण्याची परंपरा कायम असून दि.२२ वार शुक्रवार बैलपोळ्यानिमित्त येथील मंगळवार आठवडे बाजार बैलांच्या सजावटीच्या साहित्याने सजला होता. सध्या पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आले असुन शेतकरी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे.
साहित्यात झुला,वेसण, दोर, माळ, चौरंग, बेडगी, रंग, गुलाल, मठाठी, मोरकीचा आदींचा समावेश आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यांसोबत राबलेल्या बैलांच्या प्रति कृतज्ञता भावना म्हणून बैलपोळा साजरा केला जातो.
ही बातमी वाचा –स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार
बैलांना रंगरंगोटी व सजावट करून त्यांची पारंपरिक वाद्यांसह वाजतगाजत गावातून मिरवणूक काढली जाते. गावातील देवाचे दर्शन घडविले जाते. बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालण्याची संस्कृती आहे.
काही वर्षांत शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने बैलांची संख्या कमी होत आहे. त्यातच बैलांच्या सजावटीच्या साहित्याच्या दरातही वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कधी काळी प्रत्येक शेतकऱ्यांकडे दोन ते तीन दमदार बैलजोड्या असायचा परंतु आता तांत्रिक युगात तसेच महागाईमुळे विशेषतः मनुष्यबळाचा अभाव असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांकडून बैलजोडी संभाळण्याची जबाबदारी स्विकारल्याचे वास्तव्य शेतकऱ्यांनी सांगितले. तरी आता चारा महाग झाल्यामुळे जनावरे पाळणे शक्य नसल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले.

Comments are closed.