भाजपा व काँग्रेस सोबतच घड्याळीचा गजर, शिवसेनची गर्जना
शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याममुळे या निवडणुकीची चर्चा आता जोमात रंगु लागली आहे.
शेगांव नगर परिषद हद्दीत असलेला प्रभाग क्र.1 हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता परंतु मागील सन 2016 च्या निवडणुकीमध्ये या प्रभागावर भाजपाने आपले अस्तित्व कायम असले तरी यावेळी या प्रभागामध्ये काँग्रेस भाजपा सोबत शिवसेना सुध्दा रिंगणात उतरणार आहे. तर कधी काळी या प्रभागातुन कु. वंदना काशिद यांनी दिग्गजावर मात करीत घडळ्याची गजर कायम ठेवला होता. त्यामुळे ही निवडणुक नक्कीच चुरशीची ठरणार आहे. तरी आतापर्यंत अर्ज भरण्याची तयारी जरी झालेली नसली तरी या प्रभागातुन निवडणुक लढण्याकरीता यावेळी माजी नगरसेवक, नगरसेवक व माजी बांधकाम सभापती तसेच माजी नगराध्यक्ष सुध्दा या प्रभागात उतरणार असल्याने शेगांव शहरातील या निवडणुकीत नक्कीच चुरस निर्माण होणार आहे.
तरी या प्रभागाची असलेली जातीय समिकरणे आणि वाढती प्रभाग रचना यामुळे या मतदार संघात नेमकी कोण बाजी मारणार हे संकेत जरी दुर असलें तरी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये अनेक दिग्गज उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्याने यावेळी सहजासहजी या प्रभागाची निवडणुक होणार नाही.
ही बातमी वाचा –नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता!
असे आतापासून बोलल्या जावू लागले आहे. भाजपाच्या वतीने या निवडणुकीसाठी आधीपासून पायाभरणी केली असली तरी या प्रभागाचा खडा न खडा ज्ञान असलेले काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले या प्रभागाचे अभ्यासकच या निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या प्रभागाची चुरस वाढीस लागली आहे. तर या प्रभागातील अल्पवयीन युवकांनी बाजी मारत राष्ट्रवादीचा गजर कधी काळी गाजवला असला तरी यावेळी मागील अनेक वर्षाचा अनुभव पाहता हा उमेदवार सुध्दा दमदार असल्याचे मागील आजवरच्या झालेल्या निवडणुकीच्या मताधिक्यावरुन नाकारता येणे शक्य नाही.
तर आता या प्रभागामध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेले अविनाश दळवी यांनी सुध्दा या प्रभागातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केल्याचे संकेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रभागातील भेटीगाटीवरुन समोर येवू लागली आहे. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे असलेले एकनिष्ट तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आदी पदभार सांभाळत त्यांनी केलेली कामगिरी पाहता शेगांव नगर परिषदेत सभागृह गाजविण्याचा इतिहास त्यांच्या नावाने नोंद असलल्याने यावेळी त्यांनी सुध्दा शिवसेनेवर या प्रभाग लढण्याची तयारी केली आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
तरी भाजपाच्या वतीने ज्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याने त्यांना सुध्दा या प्रभागाच्या विविध समाज जातीसोबत असलेले संबध आणि मताचा टप्पा कसा गाठायचा आणि कोणती रणनिती कायम ठेवायची याची चाणक्य निती मागील निवडणुकीतून साधता आली असल्याने यावेळी कोण बहुमत मिळविणार अशा अनेक चर्चा रंगत असल्या तरी अद्याप अर्ज प्रक्रीया सुरु झाली नसली तरी या प्रभागाची आज स्थितीला या दिग्गजांचे आगमन होणार असल्याची वार्ता आता रंगु लागली आहे.
