शेगाव- राजमाता अहिल्या राणी होळकर यांचा कार्यकाळ हा समाजाभिमुख असल्याने महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एवढेच नव्हे तर विविध उपक्रमाच्या माध्यमातुन राजमाता यांच्या कार्य कतृत्वाची ओळख करून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेतला असल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या सरकार च्या वतीने दिलेला सन्मान हा महत्वपुर्ण असल्यामुळे धनगर समाज बांधवाच्या वतीने आभार मानण्यात येत असून राजमाता अहिल्याराणी च्या कार्यपध्दतीला उजाळा देण्याचे काम महाराष्ट्र शासनाने करीत 300 व्या जयंतीनिमित्त बोध चिन्ह प्रकाशित करीत त्याच्या कर्तव्य शैलीची जाण व्हावी यासाठी या बोध चिन्हाचा वापर करण्यात यावा असे आदेश पारीत करण्यात आले आहेत.
सामाजिक नेत्यांकडून अंमलबजावणी करीता पुढाकार घेण्याची गरज
राजमाता अहिल्या राणी होळकर यांची महिती व कार्यपध्दतीला चक्क शासन हे पुरस्कृत करीत असले तरी त्या पातळीवर समाजाच्या पातळीवर कार्यरत असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाचा अभ्यास करुन आपल्या गाव पातळीवरील प्रशासकीय कार्यालयात या आदेशाची अंमलबजावणी होण्यास का बरे उशिर झाला याची सहनिशा करणे गरजेचे आहे. परंतु शासनाचे आदेश झळकताच हा राजमाता यांच्या कतृत्वशैली उजाळा देण्याकरीता शासनाने दिलेला सन्मान असला तरी याबाबत सामाजिक पुढाऱ्यांनी पुढाकार घेवून अंमलबाजवणीसाठी आग्रह धरण्याची गरज असल्याचे सुज्ञांकडून बोलल्या जात आहे. तरी या करीता सामाजिक नेते कोणते पाऊल उचलतात याचीच प्रतिक्षा लागून राहीली आहे हे विशेष.
बोधचिन्ह लावण्याचा आदेश 6 मे 2025 चा
अद्यापही बहुतांशी कार्यालयात झाली नाही कारवाई
राजमाता अहिल्या राणी होळकर यांची महिती व कार्यपध्दतीला चक्क शासन हे पुरस्कृत करीत असले प्रशासकीय स्तरावर त्याचे अवलोकन व्हावा व इतरांना ते ज्ञात व्हावे हा प्रशासनाचा उद्देश असल्याने त्या संदर्भात प्रशासकीय स्तरावर हे बोधचिन्ह वापरण्याचे आदेश 6मे 2025 च्या आदेशानुसार देण्यात आले आहेत. तरी बहुतांश कार्यालयात याची अंमलबाजणी झाली नसल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे
बहुतांश भागातील अनेक शासकीय कार्यालयातील लेटरहेड वर राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या बोध चिन्हाचा वापर होत असला तरी बहुतांशी कार्यालयामध्ये या स्मृती चिन्हा चा वापर अद्यापही सुरु केला नसल्याचे दिसून येत आहे. तरी बुलढाणा जिल्हयातील काही कार्यालयामध्ये या बोध चिन्हाचा वापर करण्यास अद्यापही सुरुवात झाली नसल्याने या आदेशाची अवहलेना होत असून संबधित अधिकारी हेतुपुरस्सरपणे करीत तर नाही ना असा सवाल अाता सुज्ञ नागरिकांकडून उठविला जात आहे. या करीता शासनाचे आदेश पारित होवून बराच कालावधी उलटला असला तरी प्रशासकीय स्तरावर अधिकाऱ्यांकडून याच्या अंमलबजावणीला का उशिर होत आहे. याबाबत चर्चा रंगु लागल्या आहेत.