शेगांव येथे स्व.श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

shriram Kute Foundation

शेगांव जिल्हा बुलढाणा येथे स्व. श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. महेश खोट्टे व टीम यांच्या वतीने दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रविवार, रोजी हॉटेल विघ्नहर्ता इंन येथे ही स्पर्धा घेण्यात येईल.ही सर्व बुद्धिबळ प्रेमिसाठी आनंदाची बाब आहे.

सामाजिक आणि समाज घटकातील सर्वोतोपरी मदतीच्या व प्राेत्साहनात्मक उपक्रम राबविण्याच्या उद्दात हेतुने स्व. श्रीराम कुटे फाऊंडेशनची स्‍थापना करण्यात आली. या फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या बौध्दीकतेला चालना मिळण्याच्या उद्देशाने शेगांव शहरामध्ये बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगांव जामोद विधानसभा मतदार संघामध्ये या फाऊंडेशनच्या माध्यमातुन मोतीबिंदु मुक्त मतदार संघ अशी संकल्पना राबवित फाऊंडेशन मधील सहकाऱ्यांकडून सर्व पातळीवर नेत्र शिबीरे, शस्त्रक्रीया शिबीरे राबविण्यात आली तर कोराना महामारीच्या काळामध्ये मदतीचा हात देण्यासाठी फाऊंडेशनने महत्वपुर्ण जबाबदारी राबविली तरी आता विद्यार्थी बौध्दीक विकासाकरीता फाऊंडेशनच्या वतीने बुध्दीबळ स्पर्धेचे आयेाजन केले अाहे.

महाराष्ट्रातील युवा पिढीसाठी बुद्धिबळ खेळा बद्दल आवड निर्माण व्हावी, सोबतच त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ही बातमी वाचा –ज्वारी खरेदीस मुदतवाढ- केंद्र शासनाने मंजुरी देत ज्वारी खरेदीची मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत

तरी सर्व बुद्धिबळ पटूनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपला सहभाग नोंदवून स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ. महेश खोट्टे यांनी केले आहे.

स्पर्धेपूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तरी आपण ९४२१४६८०६४ या मोबाईल नंबर वर संपर्क साधू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *