लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रीयेस स्थगिती

सत्तेत येण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला नक्कीच फायदा झाला. आणि निवडणुकीपुर्वी ही योजना लागू करुन सर्व अर्जदार महिलांना लाभ देण्यात कुठलीच कसर न ठेवल्याने महायुतीला सत्ता हस्तांतर करण्यात अाली आता सत्तेत आल्यावर ही योजना अविरत सुरुु होती परंतु या योजनेमुळे आर्थिक फटका बसत असल्यामुळे या योजनेसाठी विविध निकष लावण्यात आले होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

 

तर आता लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेतील ई – केवायसी प्रक्रीया सरकारने अखेर तात्पुरती स्थगित केली आहे. होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगांने महिला वर्गाची नाराजी रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अलीकडेच राज्याच्या आर्थिक ताणाचा विचार करता सरकारने कठोर भुमिका घेत महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रीया सक्तीची केली.

 

ही बातमी वाचा – बहुगुणी जायफळ

 

त्यामुळे अनेक महिलांना हप्ते मिळण्यास अडथळा निर्माण झाला आणि त्यातच नाराजीचा सुर ऐकावयास मिळू लागला होता. त्यामुळे महिलांमधील नाराजीचा सुर पाहता तुर्तास राज्यकर्त्यांच्या वतीने तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात मिळणारा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात 14 हप्ते पुर्ण झाल्याने सप्टेंबर महिन्याचा निधी सुध्दा उपलब्ध झाला असल्याने या योजनेचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तसे पाहता ऑक्टांेबर 2024 पर्यंत महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. ग्रामीण व शहरी भागात आर्थिक थेट मदतीचा फायदा देणारी ही योजना महिला आर्थिक सक्षमीकरणाचा आधारस्तंभ ठरली अाहे. मात्र महायुतीने पडताळणी दरम्यान लाभार्थ्यांची पात्रतेची पडताळणी करतांना शासनाने काही महिलांना योजनेतुन वगळले आहे.

 

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

यामध्ये चारचाकी वाहनधारक महिला, केंद्र व राज्य शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, शासकीय सेवेतील कर्मचारी,एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी भगीनी, तसेच वयाची चुकीची नोंद किंवा निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिला यांचा समावेश आहे. अनेक महिलांनी सरकारने तुर्तास ई- केवायसी च्या प्रक्रीयेला स्थगिती दिल्यामुळे आभार माणले आहे. तरी ई -केवायसी मुळे हप्ता मिळण्यास विलंब होत होता. तरी आता हा हप्ता लवकरच मिळणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

Scroll to Top