कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी

संत नगरी शेगाव येथील डॉ पंजाबराव देशमुख चौक खामगाव रोड या ठिकाणी कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री तथा विदर्भात शिक्षणाची गंगा आणणारे भाऊसाहेब यांनी बहुजनांना सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली आणि त्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले अशा भाऊसाहेबांना अभिवादन करून भाऊसाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

ही बातमी वाचा – एकनिष्ठा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी बाळगावी सावधानता!

 

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे नवनिर्वाचित नगरपरिषद सदस्य अंकुश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे लखन देशमुख, संजय देशमुख, राम गावंडे, विजय निळकंठराव देशमुख, महेश देशमुख, सागर खांजोळे, सुरज खांजोळे, नागेश देशमुख, पवन देशमुख, मोहन देशमुख, मुकुंद देशमुख, दिनेश देशमुख, गुणा देशमुख, धर्मा मुंडे, गौरव देशमुख, श्याम पांडे, गणेश शेगोकार, कृष्णा चिमणकर, श्याम भाऊ यांची उपस्थिती प्रामुख्याने होती.

 

भाऊ साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत देशमुख यांनी केले भाऊसाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन युवकांनी कार्य करावे असा संदेश या माध्यमातून देण्यात आला

Scroll to Top