महाराष्ट्रात असलेल्या बुलढाणा जिल्हयातील खामगांव ही पुरातन बाजारपेठ असून येथील कापूस आणि चांदीच्या व्यापारामुळे खामगांव नगरी ही रजतनगरी म्हणून प्रख्यात आहे. व्यापारासोबत येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या उद्योग समुहामुळे जागतीक पातळीवर खामगांव शहराचा नावलौकीक आहे. तर सांस्कृतिक, क्रिडा, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राचा आवाका या शहरात प्रारंभीपासूनच जपला जात असला तरी रजतनगरी ही श्री मोठ्या देवीची असल्याची अख्यायिका असल्याने खामगांव शहरामध्ये श्री मोठी देवी शांती उत्सव हा कोजागिरीपासून प्रारंभ होत असतो.
होवू घातलेल्या कोजागिरी पौर्णिमेला श्री मोठी देवी शांती उत्सवाची जय्यत तयारी खामगांव शहरात असून खामगांव शहरामध्ये विविध भागामध्ये अनेक आयोजकांकडून या उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. तरी श्री मोठी देवी शांती उत्सव समितीच्या वतीने आयोजित हा सोहळा भव्य दिव्य असा असतो. याकरीता आयोजित समिती ही नेहमीच जय्यत तयारी करीत असते कोजागिरी पौर्णिमेपासुन सरु होणारा हा उत्सव तब्बल 11 दिवस चालतो या कालावधीमध्ये खामगांव शहरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळते.
ही बातमी वाचा –राज्यातील दसरा मेळाव्यानंतर अकोल्यातील धम्म मेळावा ठरणार चर्चेचा
या उत्सवामध्ये भक्त देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात आणि या उत्सवकाळात देवीसमोर नवस बोलले जातात व नवस फेडतात हाजारो भाविक या उत्सवात सहभागी होतात आणि देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या उत्सवादरम्यान भाविकांची देवीवर असिम श्रध्दा असते आणि ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचा दरबार 24 तास उघडा ठेवला जातो आणि देवीची सकाळी व रात्री मंगल वाद्यासह आरती केेली जाते.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवीच्या मुतीची विर्सजन खामगांव शहरातील ऐतिहासिक जनुना तलावात करण्यात येते .तरी आता कोजागिरीला पौर्णिमेला सुरु होणाऱ्या श्री मोठी देवी शांती उत्सवाची आस खामगांव करांसह जिल्हावासियांना व राज्य व परराज्यातील भाविकांना ओढू राहीली आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
रजतनगरी’ हे खामगाव (बुलढाणा) शहराचे टोपणनाव आहे, जेथे शुद्ध चांदीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. खामगावात चांदीच्या मूर्ती, दागिने आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, ज्यामुळे हे शहर देशभरातील चांदीच्या खरेदीसाठी एक प्रमुख केंद्र बनले आहे.
रजतनगरी खामगावची वैशिष्ट्ये:
शुद्ध चांदीचा बाजार: खामगावची चांदीची बाजारपेठ तिच्या शुद्धतेसाठी आणि विविध प्रकारच्या चांदीच्या उत्पादनांसाठी ओळखली जाते.
प्रसिद्धी: या शहराची चांदीची बाजारपेठ एवढी प्रसिद्ध आहे की येथे मोठे नेते, अभिनेते आणि क्रिकेटपटू देखील चांदी खरेदीसाठी येतात.
उत्पादने: येथे चांदीच्या गणेशमूर्ती, दागिने, ताट-वाटी, सिंहासन, मंदिर आणि शिक्के यांसारख्या वस्तू बनवल्या आणि विकल्या जातात.
धनत्रयोदशीचा मुहूर्त: धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अनेक ग्राहक चांदी खरेदीसाठी खामगावात येतात.
