राजकारणात काहीच अशक्य नसतं. याचा प्रत्यय राज्यवासीयांना वेगळा नाही, पण आता आजवर विरोधकांच्या रिंगणात असलेले दोन पक्ष आता एकत्र लढणार असल्याचे घोषणेने वेगळाचा व्टिस्ट पहावयास मिळणार आहे.
राजकीय वाटा वेगवेगळ्या आणि कुटुंब जोडलेलं या धर्तीवर बारामतीच्या कार्यक्रमामध्ये एकत्र असलेले काका-पुतण्या यांच्या बातम्यांच्या चर्चा आज दिवसभर प्रसारमाध्यमातुन प्रकाशित होत होत्या तर काल रात्रीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीच्या तिकीट वाटपातील बोलणी फिस्कटल्यामुळे शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडे बाेलणी सुरु केल्याची वार्तापत्रे प्रसारमाध्यमातुन देण्यात येत असतांना व आज दिवसभर बारामतीतील उदघाटन साेहळ्यास भारताचे उद्योजक यांच्या उपस्थितीत झालेला सोहळा आणि या सोहळ्यास दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे अामदार, खासदार आणि दोन्ही पक्षाचे अध्यक्ष यावेळी या कार्यक्रमाच्या एकाच मंचकावर उपस्थित असल्याने कोणत्या नेत्याच्या विचारधारेवर जगायचे हा प्रश्न मागील काही दिवसापासून कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ घालणारा असला तरी आता आलेल्या निर्णयामुळे उद्याची काय खेळी असणार याचा अंदाज आता दोन्ही राष्ट्रवादी गटातील कार्यकर्त्यांना नसल्यामुळे कोणता झेंडा घेवू हाती अशी वास्तविकता निर्माण झाली आहे.
ही बातमी वाचा –आताची बातमी – भाजपाचा निर्णय- तिकीट वाटपाबाबत घराणेशाहीला नकार !
तर आता भावनिकतेला अनुसरून आणि विरोध आजुबाजुला सारुन आजवर विरोधकाची भुमिका मांडत असलेल्या पक्षांची अाजची बोलणी ही नक्कीच पक्की आहे का? हे उद्याच्या निर्णयावर ठरणार आहे. तरी आता याबाबत अनेक चर्चांना उधाण आले हे एवढे मात्र निश्चीत.
