वाटीका चौकात अज्ञात वाहनाच्या अपघाताने इसमाचा मृत्यु

शेगांव- शेगांव शहरातील वाढत्या लोकवस्त्यामुळे शेगांव शहराचे विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे वाहनांची वाढती गर्दी ही नियमांचे उल्लंघन करीत असल्याने आज वाटीका चौकामध्ये अपघात झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
शेगांव – शेगांव शहरातील खामगाव मार्गावर असलेल्या वाटीका चौकामध्ये अज्ञात वाहनाने एका इसमास धडक दिली असल्याने त्या इसामाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मयताचे नांव अजय सापुर्डा घाईत असून ते बाहेरगावचे रहिवाशी असले तरी आपल्या मुलांच्या शिक्षणाकरीता गुरुकृपा चेंबर, वाटीका येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे.

शेगांव शहरात कायदा व सुव्यवस्थापनाचा अभाव असल्याने शहरातील वाहनचालकांची मनमानी भोवल्याने इसमाचा मृत्यु झाल्यामुळे या ठिकाणी माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्यासह या परिसरातील प्रतिष्ठीत नागरिकांचा जमाव येथे मोठा प्रमाणात जमला होता.त्यामुळे या घटनेबाबत नागरिक संतप्त झालेले चित्र पहावयास मिळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची तिव्रता पाहता परिसरातील व शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी तेथे गर्दी केली व अपघातग्रस्तास उपचारार्थ दाखल केले.

 

ही बातमी वाचा –प्रभाग क्र४ मध्ये अस्तित्वाची लढाई!

 

शहरात वाहतुक नियंत्रणाचा अभाव आणि वाहनचालकांची मनमानी ही सद्या मानवी जिवनाला घातक होत असल्याचे द्योतक या घटनांमधून समोर येत असल्याचे नागरिकांकडून संतापाव्दारे व्यक्त होत आहे. तरी या प्रकाराला आळा घालावा. अशी मागणी संतप्त जमावाने पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना व्यक्त केली.

 

 

वाहतुक वर्दळीचा प्रभाव थांबविण्यासाठी गतिरोधक आवश्यक

शेगांव- शेगांव शहरातील खामगांव मार्गावरील जगदंबा चौक, वाटीका चौक, जिजाऊ चौक हे आता वर्दळीचे चौक बनले आहेत. त्या ठिकाणी वाहनाला अावरण्याकरीता गतिरोधक लावण्याची आवश्यकता असली तरी प्रशासनाचा याकडे कानाडोळा होत असल्याने असे अपघातातुन जिव जात अाहेत. काही वर्षापुर्वी जगदंबा नगरातील मुलीच्या मृत्युमुळे शोककळा पसरली होती. तरी आता वाहतुक नियंत्रणासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलल्या जात आहे.

Scroll to Top