सुज्ञ नागरिकांकडून होत आहेत सवाल, मात्र न.प.च्या आरोग्य विभागाची दिरंगाई
शेगांव- शेगांव नगर परिषद हद्दीत असलेल्या रेल्वे क्रासिंग करीता उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर रस्त्याच्या बाजुला जमलेली माती व कचऱ्याचे ढिग जमा करण्याचे काम नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मागील काही हप्त्यापासून केले आहे. त्यावर पावसाचे आगमन सुध्दा होवून गेले आणि तरी सुध्दा सदर ढिग उचलण्याकरीता कोणतीच कारवाई होत नसल्याचे वास्तव्य शेगांवकर अनुभवत आहे.
शेगांव नगर परिषदेचा कार्यभार हा मागील काही वर्षापासून मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी यांच्या अखत्यारीत असून या उड्डाण पुलाच्या आजुबाजुला हे कचऱ्याचे ढिग साचून तब्बल दोन आठवडे उलटत असल्याच्या प्रतिक्रीया या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या वतीने वर्तविण्यात आल्या असल्या तरी आरोग्य विभागाचा भोंगळा कारभार हा मानवी हिताला धोका पोहचविणारा असल्याचे बोलल्या जात आहे.
शेगांव शहरातील मुख्य आणि वहिवाटीचा असलेल्या या उड्डाण पुलाच्या आजुबाजुला अनेक झाडे झुडपे उगवली असून या उड्डाणपुलाच्या आजुबाजुलाच गार्डनचे स्वरुप येत असल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे. तरी कचऱ्याचे ढिग एक दो न दिवस नव्हे तर दोन आठवड्यापासून पडल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून या कचऱ्याचे ढिग उचलण्याकरीता मुहुर्त काढण्याची आरोग्य विभाग प्रतिक्षा करीत आहे का असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.