Shankarbaba Paplkar Vajjar Fata, Amravati

अनाथ मालाची प्रेरणादायी झेप: महसूल सहायक पदापर्यंत

जिवनाच्या वाटेवर चालत असतांना अनेक उन्हाळे पावसाळे जिवनात असले तरी संघर्षमय वाटचाल करण्याच्या बालिकेने राज्यातील महत्वपुर्ण अशा महसूल सहायक पदाचा पदभार स्विकारणे ही नक्कीच इतरांकरीता प्रेरणादायी ठरणारी बाब आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

उद्या साेमवारी 6 ऑक्टोंबर रोजी माला शंकर पापळकर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून सरकारी खुर्चीत बसेल तेव्हा तिला शुभाशिर्वाद देण्यासाठी वझ्झरच्या आश्रमातील तिच्या 123 दिव्यांग, अनाथ भावंडासह पद्यश्री शंकरबाबा पापळकर उपस्थित राहणार आहेत.

जळगावच्या रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या मालाने महसूल सहायक पदाचा पदभार घेणे हे नक्कीच ऐतिहासिक असे ठरणार आहे. राज्यामध्ये ही पहिलीच वेळ असणार आहे की, जन्मतः अनाथ, बेवारस असलेल्या मालाने राज्य लोकसेवा आयोगातुन परीक्षेत देत महसूल सहायक पदावर पोहचेत ही महाराष्ट्रातील अव्दितीय क्षण ठरणार आहे. कारण एकाद्या अधिकाऱ्याच्या नोकरीचा पहिला दिवस साजरा करण्याकरीता इतक्या प्रचंड संख्येेने दिव्यांग आणि त्यातही अनाथ मुलांनी आपल्या एकुलत्या बापासह उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असणार.

ही बातमी वाचा आजपासून चेक क्लिअर होण्याची प्रक्रीया अवघ्या काही तासातच..

 

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षेकरीता सजग पालक हे आपल्या पाल्यावर अतोनात खर्च करीत सुविधा उपलब्ध करुन देत असले तरी अनाथ असलेल्या माला ने मारलेली बाजी ही नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023-24 च्या परीक्षेमध्ये माला शंकर पापळकर उर्त्तीण झाली. शनिवार रोजी राज्यभरातील तब्बल 10309 जणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने प्रदान करण्यात आली. नागपुरातील कवी सुरेश भट सभागृहामध्ये पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये माला शंकर पापळकर हीने विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदारी यांच्या हस्ते महसुल सहाय्यक पदाचे नियुक्तीपत्र स्विकारले.

 

त्यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट हा नक्कीच एेतिहासिक क्षणाचा आठवण करणारा ठरल्याचे बोलल्या जात आहे. तरी हा सोहळा अभुतपुर्व असा की, माला पापळकर साखरा जन्मापासून अनाथ प्रवास हा अनेकांच्या वाट्याला आला असला तरी या जिवनाच्या वाटचालीवर शंकर पापळकर नावाचा बाप हा सर्वच अनाथांना भेटत नाही.आणि वझ्झर फाट्यावरील बालसभागृह देखील अनाथाच्या नशिबी नसते.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

नागपुरात मुक्कामी असलेल्या माला पापळकर हिच्यासोबत फोनवर विचारणा केली असता आता महिना 50 ते 60 हजार पगार मिळेल आणि तु आता नागपुरात राहणार आहे. या पैशाचे काय करणार अाहेेस? त्यावर मालाने उत्तर दिले की, माझ्या खर्चापुरते ठेवेन, बाकी माझ्या भावंडांसाठी देईल. तिच्या पडत्या काळात तिला आपलेपणाची उब वडीलाचे छायाछत्र शंकर बाबा पापळकर आणि 123 दिव्यांग व अनाथ बांधवाचा विसर तिला पडलेला नाही. घराची आठवण ठेवावी त्याच अतुरतेच बालगृहाची आठवण ती जोपासत असल्याचे तिच्या बोलण्यातुन जाणवली. उद्या सोमावारी जेव्हा ती पदभार घेणार आहे. त्यावेळी तिला तिचे सर्व भावंडे भेटणार आहेेत हे सांगतांनाही तिच्या आनंद गगणात मावणारा नव्हता.

माला पापळकर (Mala Papalkar) या अमरावती जिल्ह्यातील एक दृष्टिहीन महिला आहेत, ज्यांना जन्मतः बेवारस अवस्थेत सापडल्यानंतर पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी दत्तक घेतले आणि वाढवले. त्यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा उत्तीर्ण केली आणि महसूल विभागात अधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यांची ही यशकथा अपंगत्व असूनही, परिस्थितीवर मात करून यश मिळवण्यासाठी प्रेरणादायक आहे.

माला पापळकर यांचा जीवनप्रवास:

जन्माच्या वेळी सापडणे: सुमारे 25 वर्षांपूर्वी, माला पापळकर जळगाव रेल्वे स्टेशन किंवा कचरापेटीत बेवारस अवस्थेत सापडल्या.

शंकरबाबांचे छत्र: अनाथ आणि बेवारस मुलांसाठी काम करणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांनी त्यांना आपल्या आश्रमात आणून आधार दिला आणि तिचे नाव ‘माला शंकर पापळकर’ ठेवले.

शिक्षण आणि जिद्द: शंकरबाबांच्या आश्रमात त्यांनी दृष्टिहीन मुलांसाठीच्या शाळेत शिक्षण घेतले आणि ब्रेल लिपीत प्राविण्य मिळवले.

MPSC परीक्षेत यश: अडीच दशकांहून अधिक काळ परिस्थितीशी संघर्ष करून, माला पापळकरने अथक प्रयत्न आणि जिद्दीने MPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवेत महसूल अधिकारी म्हणून निवड झाली.

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व: माला पापळकर यांची ही कथा अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहे, जी शारीरिक मर्यादांना झुगारून जिद्दीने ध्येय गाठण्याचे उदाहरण आहे.

Scroll to Top