संपुर्ण जगाला क्रिकेट जगताने वेड लावले असले तरी या खेळामध्ये भारत हा सुध्दा नेहमीच सक्रिय भुमिका बजावित असतो. 1983 साली कपिलदेव तसेच 2011 साली महेंद्रसिंग धोनी यांच्या कार्यकाळामध्ये पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दोनदा विश्वचषक जिंकुन विक्रम नोंदविला होता. तर आता त्या क्षणाची पुनरावृत्ती हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वात भारताच्या महिला संघाने रविवारी आयसीसी महिला वन डे विश्वचषकावर विजय मिळवला आहे. त्यामुळे अवघ्या देशभरात दिवाळी साजररी करण्यात आली.
रविवारी झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने 7 बाद 298 धावांपर्यंत मजल मारली तर त्याचे प्रत्युत्तर देत दक्षिण अफ्रिकेला 45.3 षटकांमध्ये 246 धावांवर गुंडाळत विश्वचषक ताब्यात घेत नवा इतिहास घडविला आहे.
महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकरीता दक्षिण अफिक्रेला 299 धावंाचे आव्हान होते यावेळी ब्रिटस (23) बॉश (0) सुने लूस (25), मारिझान (4), जाफ्ता (16) या ठराविक अंतराने बाद होत राहिल्या तर शतकवीर लॉरा हा झुंजत असतांना दक्षिण अफ्रीकेची धाव सरासरी लक्षवेधी असल्यात अंतिम टोकापर्यंत मोठे आव्हान दक्षिण अफ्रिकेसमाेर होते.
तर या खेळामध्ये डर्कसेनने 35 धावा फटकावत हा खेळ दक्षिण अफ्रिकेच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न केल्या भारतीयांच्या तांेडची पाणी पळविले होते परंतु खेळाडु बाद होण्याचा क्रम राहिला. तर लॉराकडून ऐन मोक्याच्या क्षणाला चुक झाल्याने हा डाव दक्षिण अफ्रिकेला अवघ्या 45.3 षटकामध्ये 246 धावामध्ये गुंडाळावा लागला. तरी कालच्या या खेळामध्ये भारताने ऐतिहासिक विजयावर अगदी थाटात शिक्कामोर्तब केले.
ही बातमी वाचा –दहावी बारावीच्या परीक्षेचे असे असणार अंतिम वेळापत्रक
सुरुवातीला दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली तर भारताने सुध्दा 50 षटकामध्ये 7 बाद 298 धावा करित दक्षिण अफिक्रेसमारे आव्हान उभे केले. त्यामध्ये स्मृती मानधना (58 चेंडुत 45) व शेफाली वर्मा (78 चेंडुमध्ये 87 ) यांनी 104 धावांचा डोंगर उभा करण्यास सुरुवात केल्याने आजच्या खेळामध्ये भारतीय संघ 325 धावा पुर्ण करेल असा अंदाज व्यक्त केला जात होता.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
परंतु भारतीय फलंदाजाची गती पाहता दक्षिण अफ्रिकेच्या गोंलदाजांनी या खेळामध्ये वचक कायम ठेवल्याने भारताला 300 धावाच्या आतच थांबावे लागले असले तरी रविवारच्या महिला विश्व चषकावर भारताने विजय मिळवत ऐतिहासिक नोंदविला असल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी जाेमात सुरु होती.
