जळगाव जामोद विधानसभेत वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या लढती चुरशीच्या…

कोणता उमेदवार करणार येणाऱ्या काळात मतदार संघाची तपासणी

शेगांव- सद्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचाराच्या तोफा दणदणत असल्या तरी यावेळी जळगांव जामोद विधानसभा निवडणुकीची रंगत ही चर्चेची ठरु लागली आहे. यावेळेस या मतदार संघामध्ये विद्यम्‍ान असलेले आमदार डॉ. संजय कुटे यावेळी पाचव्यांदा् निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदार संघाचा विक्रम मोडीत काढत ते चाैथ्यांदा आमदार बनले असल्याचा इतिहास त्यांनी घडविला या मतदार संघामध्ये या अगोदर जास्तीत जास्त तीन वेळा सलग आमदार हाेण्याचा बहुमान इतरांनी घेतला असला तरी यावेळी पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरुन विजयाचा गुलाल उधळण्याच्या तयारीत असल्याचे चित्र मतदार संघात असून मागील 20 वर्षाच्या कार्यकाळापासून या मतदार संघात विकास आणि सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी अनेकाविध योजना राबवित या मतदार संघात विविध समाज घटकाशी आपलेपणाची बांधिलकी जोपासण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही.

तर आपल्याकडे आलेल्याच्या समस्याचे निराकारण करण्याकरीता मागील 20 वर्षात कुठलीच कसर ठेवली नसल्याचे वास्तव्य असल्याने या मतदार संघातील प्रत्येक समाज घटकाची नाडी तपासण्याच कसबं डॉ. कुटे यांच्याकडे आहे. एवढेच नव्हे तर जातीपातीच्या राजकारणाला बगल देत सर्वसामान्यांना आधार देण्याकरीता सपत्नीक या मतदार संघामध्ये त्यांचा पारिवारिक भेटीगाटी, सुखदुखात साथ देणारे नेता अशी ओळख असलेले डॉ. संजय कुटे यांना मंत्रीपदाची माळ सुध्दा मिळाली होती. त्यामुळे मतदार संघाचे नंदनवन करण्यात कुठलीच कसर ठेवलेली नाही. तर या मतदार संघाचा दांडगा जनसंपर्क ठेवणाऱ्या डॉ. स्वातीताई वाकेकर यावेळी दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. मागील 2019 च्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव पाहता या मतदार संघात आपण कुठे कमी पडलो. याचा मुत्सद्ी ज्ञानाने अभ्यास करीत ज्या मतदारांनी मला मताधिक्य दिले.

त्याचे आभार मानत या मतदार संघात भेटीगाठी, सर्वसामान्य मतदारांचे सुखदुख सावरण्याकरीता डॉ. स्वातीताई वाकेकर यांच्या मतदार संघातील भेटीगाठीचे सत्र हे सातत्याने सुरु आहे. तर एवढेच नव्हे विविध आंदोलनाच्या माध्यमातुन त्यांनी सर्व सामान्यांशी आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडु हे आपले वडील माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या माध्यमातुन लहानपणापासून अनुभवणाऱ्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांना 2019 च्या निवडणुकीमध्ये 67504 इतके मताधिक्य मिळाले होतेे. तरी यावेळी महायुतीच्या सत्ताकारणाच्या विरोधात जनतेचा असलेल्या रोषाचे पाठबळ घेवून या मतदार संघामध्ये पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये दमदार उडी घेत प्रचारात सुध्दा आघाडी घेतली आहे. महिलांच्या समस्येला न्याय देण्याची भुमिका, शेतकरी हितासाठी असलेल्या योजना आणि विकासबाबत असलेल्या उणीवा पुर्ण करण्याच्या जोरावर प्रचारातही ते अग्रसेर असल्याने यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये या मतदार संघात वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. स्वाती ताई वाकेकर यांना मतदार संघातील मतदाराकडुन पसंती देण्यात येणार का? असा सवाल सुध्दा चर्चेचा ठरत आहे.

हे वास्तव्य सुध्दा नाकारता येणारे नाही. तर या मतदार संघामध्येच वैद्यकीय क्षेत्रामध्ये पारंगत असलेले डॉ. प्रविण पाटील यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्‍ट झाले असून प्रचाराची धुरा सुध्दा वंचित आघाडीच्या नेत्यासह समाज बांधवांच्या माध्यमातुन मोठ्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. यामतदार संघात असलेला समाज बांधव व वंचित बहुजन आघाडीचे मताधिक्य यांची गोळा बेरीज करता त्यांनी केलेल्या विविध सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रमासोबत शेतकरी हितासाठी विविध योजनांची अंमलबजावणी तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतांना गोर गरीबांकरीता केलेली मदत ही त्यांची ओळख असल्याने या मतदार संघामध्ये यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील तिन तज्ञ डॉक्टर निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब अजमावत असल्याचे वास्तव्य आहे. तरी यावेळी मतदार राजा कुणाला या मतदार संघाची जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हे विशेष

Leave a Comment