देशात असलेल्या सरकारच्या वतीने या अगोदर केलेल्या जीएसटीच्या नियमावलीत बदल केला आहे. आणि त्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री यांच्या वतीने जीएसटीच्या बिलात कपात केली असल्याने आता भारतावसीयांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तु स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या जीएसटी कपातीचे सर्वत्र स्वागत होत आहे. राज्यात असलेली जीएसटीची कपात ही नक्कीच सर्वसामान्य नागरिकांना सोयीची ठरणार असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी वस्तू व सेवा करात बदल करण्याची घोषणा केली होती . त्याला अनुसरुन जीएसटी करामध्ये 12 आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे फक्त 5 आणि 18 टक्के हे जीएसटी स्लॅब शिल्लक राहिले होते. यामुळे आतापर्यंत 12 आणि 28 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये असणाऱ्या वस्तूंवरील कर कमी झाला होता. या वस्तू 5 आणि 18 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आल्या होत्या.
ही बातमी वाचा –उच्च अधिकारी तुकाराम मुंढे यांचे निर्देश- राज्यातील बोगस दिव्यांगाची होणार पडताळणी
तर आतापर्यंत पाच टक्के जीएसटी असलेल्या अनेक वस्तू करमुक्त झाल्या होत्या. या नव्या जीएसटी कराची सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू, किराणा माल, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, घरगुती उपकरणे, टीव्ही, एसी, कार, बाईक, मोबाईल अशा अनेक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे सामान्य वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
– या वस्तुवर 0% जीएसटी आकारणी ?
* खाद्यपदार्थ- प्रोसेस्ड दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी टू इट चपाती, पराठा
* शैक्षणिक साहित्य- पेन्सिल, वही, चार्ट, प्रयोगशाळेतील वह्या
* आरोग्य क्षेत्र- 33 जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा
या वस्तुवर 5% जीएसटी आकारणी?
* खाद्यपदार्थ- वनस्पती तेल, बटर, तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, नारळपाणी
* शाम्पू, तेल, टुथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम
* घरगुती वापराच्या वस्तू- किचनमधील वस्तू, लहान मुलांची दुधाची बाटली, छत्री, मेणबत्ती, शिलाई मशीन, नॅपकिन,डायपर्स, हँडबॅग, फर्निचर
* कृषी साहित्य- ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, सिंचन साहित्य, ठिंबक सिंचन साहित्य, पंप
* वैद्यकीय वस्तू- थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, चष्मा, रबर, हातमोजे
* नक्षीकाम केलेल्या वस्तू, हाताने तयार केलेले कागद, पेटिंग्ज, वीटा, टाईल्स
– या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी लागणार?
* इलेक्ट्रॉनिक वस्तू- वातानुकूलित यंत्र (एसी), वॉशिंग मशीन, एलईडी एससीडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर
* वाहने- लहान कार, तीनचाकी वाहने, रुग्णवाहिका, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, व्यापारी वाहने
* ट्रॅक्टरसाठी लागणारे हायड्रोलिक इंधन, इंधन पंप
* सेवा क्षेत्र- हॉटेल (दिवसाला 7500 पेक्षा कमी असणारी), चित्रपटगृह (100 रुपयांपेक्षा कमी तिकीट असणारी), ब्युटीपार्लर
तरी जीएसटी चे नवे दर अाजपासून लागु झाल्याने त्याचे स्वागत होत आहे.