तुझी चड्डीही जागेवर ठेवणार नाही- शिवाजी वाटेगकरांचा इशारा

Shivaji Wategaonkar

गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा सर्वस्तरावरुन होत आहे निषेध

राजकारणामध्ये टिका टिप्पणी करणे हे नेहमीच सुरु असते. परंतु टिका टिप्पणी करण्याबाबत या अगोदरच्या काळातही मोठमोठ्या नेत्यांनी वा विरोधकांनी सत्तेत असणाऱ्यांच्या विरोधात टिका करण्याची कुठलीच कसर सोडली नसली तरी टिका टिप्पणी करतांना मर्यादा ओलांडल्याचे अनुभव सद्याच्या राजकारण्यांमध्ये दिसून येत आहे.

 

याबाबत असे की, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर हे जत येथील पंचायत समिती च्या अभियंत्याच्या अात्महतेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याने त्यांनी मर्यादा ओलांडली असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पहिल्यांदा व्यक्त केली आहे.

 

तरी भाजपाचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील व त्यांच्या वडीलांबद्दल केलेले वक्तव्य हे चुकीचे असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना समजविण्याचा प्रयत्न केला असला तरी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमातुन व्यक्त केले आहे. तरी आता हा वाद विकोपाला पोहचत असल्याचे चित्र प्रसारमाध्यमातुन अनुभवयास येत आहे.

 

ही बातमी वाचा –पडळकरांच्या आक्रमक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

तरी या प्रकरणामध्ये राजाराम बापुंचे समर्थक शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना थेट इशारा दिला असून शिवाजी वाटेगावकर यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करीत म्हणाले की,

जयंत पाटलाविरुध्द काहीतरी बाेलतो, तो माणूस तुला काही आलतु-फालतू वाटला का? तु वाळवा तालुक्यात यायचा विचार कर, तुझे कपडे काढूनच तुला पाठवतो. तुझी चड्‍डी सुध्दा ठेवणार नाही. तु जत तालुक्यातुन निवडून येवून दाखव. तुला समाजात काही काडीचीही किंमत नाही. धनगर समाजाला तू मान खाली घालायला लावलीस.

बापुसारख्यांवर बोलतोस एवढा मोठा झाला का तू..
असा जोरदार हल्लाबोल करत त्यांनी पडळकरांना दिला आहे.

या वक्तव्याबद्दल शरद पवारांची नाराजी

याबाबत शरद पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले ते याेग्य नाही. कोणाच्याही वडीलाबद्दल, परिवाराबद्दल विधान करणं अयोग्य आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. तरी आता अशा वक्तव्याचे कधीही समर्थन करणार नाही.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *