आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याकरीता केंद्र शासनाच्या वतीने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत नव्याने वाढवली आहे. त्यामुळे या तारखेच्या आतमध्ये पॅन कार्ड धारकांना आधारकार्ड सोबत पॅन लिंक करणे अनिवार्य राहणार आहे. अन्यथा पॅन धारकांचे पॅन कार्ड हे दि. 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे.
तरी पॅनकार्ड धारकांचे आधार लिंक नसल्यास पॅन कार्ड निष्क्रीयतेमुळे पॅन कार्ड धारकांना प्राप्तीकर भरता येणार नाही तर पॅन कार्ड धारकांचे पगार सुध्दा बँक खात्यात जमा होण्यास अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे.
तरी केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मुदतीमध्ये पॅनकार्ड आधार कार्ड लिंक करण्यात यावे असा सल्ला तज्ञांंनी दिला आहे. जेणेकरुन सर्वच आर्थिक व्यवहार सुरळीत राहील.
कोणत्या पॅनकार्ड धारकांसाठी साठी हे बंधनकारक!
केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून दि. 3 एप्रिल 2025 रोजीच्या अधिसुचनेनुसार 1 ऑक्टोंबर 2024 च्या अगोदर ज्यांना आधारच्या एनरोलमेंट आयडीच्या माध्यमातुन पॅन कार्ड दिले आहे त्या पॅन कार्ड धारकांनी आपला आधार क्रमांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत कळवावे. म्हणजेच ज्यानी आधार कार्डच्या एनरोलमेंट आयडीच्या माध्यमातुन पॅन कार्ड तयार केले असेेल तर आधार नंबर मिळविल्यावर पॅन कार्ड आधारशी लिंक करे अनिवार्य आहे. आणि ही प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने पार पाडता येते
आधार- पॅन लिंक करण्याकरीता ही सोपी पध्दत
आधार-पॅन लिंक करण्याकरीता इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवरील लिंक आधार टॅब वर क्लिक करा. आधार व पॅन नंबर टाकून व्हॅलिडेट बटण दाबा. मोबाईलवर ओटीपी आल्यावर तो ओटीपी टाकल्यानंतर ही प्रक्रीया पुर्ण होईल आणि आधार पॅन साेबत लिंक होईल.
ही बातमी वाचा – महाराणी ताराराणी: मोगली फौजांविरूद्ध आक्रमक भूमिका!
पॅन निष्क्रीय झाल्यास काय होणार!
* बँक खाते /डिमेट खाते उघडता येणार नाही
* 50 हजारापेक्षा जास्त ठेवी ठेवता येणार नाही
* गुंतवणुक,एसआयपी तसेच ट्रेडींग करणे अशक्य होईल
* सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही.
*कर्जाजा अर्ज स्विकारला जाणार नाही.
*घर, वाहन खरेदी विक्रीला अडचणी येतील.
* परकीय चलनाचे व्यवहार करता येणार नाहीत
*बिलींग तसेच कर भरण्याचे सर्व कामकाज थांबेल.
आधार पॅन लिंक करण्याकरीता खालील लिंक वर क्लिक करुन पॅन आधार लिंक करु शकता.
