महाराष्ट्रात न्यायप्रक्रीयेकरीता असलेल्या उच्च न्यायालयाकरीता तब्बल सव्वा दोन हजार जागांची मेघाभरतीबाबत मंत्रीमंडळाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंुबई उच्च न्यायालय तसेच अपिल शाखा तसेच नागपुर खंडपीठ आणि औरगांबाद खंडपीठाकरीता एकुण सव्वा दोन हजार जागांची मेघा भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी पाहुया कोणत्या ठिकाणी किती जागा
महाराष्ट्र राज्यात न्याय प्रक्रीयेकरीता कार्यरत असलेल्या न्याययालयीन प्रक्रीयेला गतीमान करण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालय नागपुर आणि औरंगाबाद खंडपीठाकरीता नव्याने 2 हजार 228 पदांची निर्मिती करण्यास मंगळवारी मंत्रीमंडळात बैठक घेण्यात येवून मान्यता देण्यात अाली आहे.
ही बातमी वाचा –बच्चु कडुंच्या डामाडोल राजकारणाचा फटका!
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मुळ शाखा व अपील शाखा तसेच औरंगाबाद आणि नागपुर खंडपीठाकरीता गट -अ ते गट-ड संवर्गात अतिरिक्त पदांची निर्मीती करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने पदनिर्मीती करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंत्री मंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या पदनिर्मीतीसह या पदांसाठींच्या वेतन अनुदान व अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीनंतर मंजुरी देण्यात आली ही पदे गट- अ ते गट – ड या संवर्गातील आहेत. सदर पदे ही प्रशासकीय कामकाजाशी निगडीत आहेत.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
परंतु मंजूर झालेल्या पदापैकी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेशी संबधित 562, अपिल शाखेशी संबधित 779 औरंगाबाद खंडपीठाकरीता 591 आणि नागपुर खंडपीठाकरीता 296 पदाची निर्मीती करण्यात येणार आहे
