दिवाळी सणाच्या परतीच्या प्रवासाकरीता दि.28 ऑक्टोंबरपासून भुसावळ विभागातुन 15 विशेष गाड्या
आजच्या अत्याधुनिक युगामध्ये प्रवाश्यांना सोयीचा प्रवास मिळावा आणि किंमतही माफक असावी याकरीता रेल्वे प्रशासन सज्ज असते. सद्या दिवाळीच्या सुट्टया असल्यामुळे बाहेरगावी कामावर असलेले अनेक नागरिक हे सुट्टीनिमित्त आपल्या गावी आले आहेत. तरी परतीच्या प्रवासाकरीता गैरसौय होवू नये याकरीता रेल्वे विभागाने तब्बल 23 विशेष गाड्यांची सोय केली आहे तर भुसावळ विभागातून तब्बल15 गाड्या धावणार आहेत.
मुंबई महानगरातुन सुटणाऱ्या गाड्यामध्ये छ.शिवाजी महाराज टर्मिनस- नागपुर (क्र.01011) ही गाडी नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ येथे थांबेल. तर छ.शिवाजी महाराज टर्मिनस- दानापूर अनारक्षित विशेष गाडी (क्र.01013) नाशिक नंतर भुसावळ, खंडवा या स्थानकावर थांबणार आहे. सीएसएमटी- गोरखपुर विशेष (क्र. 01079 ) ही गाडी नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ या स्थानकावर थांबेल. तसेच लाेकमान्य टिळक टर्मिनस- दानापूर गाडी क्र. 01143 आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- मुजफ्फरपूर गाडी क्र.01043 या गाड्यांनाही भुसावळला थांबा राहणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनस- वाराणसी विशेष गाडी क्र.04225 ही गाडी देखील भुसावळ मार्गे जाणार आहे.
ही बातमी वाचा –सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त!
पुणे स्थानकावरुन सुटणाऱ्या गाड्यांमध्ये पुणे- गाझीपुर सिटी (क्र01431) पुणे-गोरखपुर क्र.01415, पुणे-दानापुर गाडी क्र 01449, पुणे-अमरावती क्र.01403, पुणे नागपुर गाडी क्र.01401, हडपसर- नागपूर गाडी क्र. 01202 या सर्व गाड्यांना जळगांव आणि भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे.
नागपुर पुणे- क्र.01410 आणि नागपुर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस क्र.01012 या दोन्ही गाड्यांनाही भुसावळ, जळगांव, पाचोरा, चाळीसगाव असे थांबे राहणार असल्याचे रेल्वे विभागाकडून कळविण्यात आले आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
रेल्वे विभागाच्या वतीने परतीच्या मार्गाकरीता विशेष गाड्या सुरु केल्या असल्या तरी त्याच्या थांब्याबाबत प्रवाश्यांनी रेल्वे विभागाच्या चौकशी कक्षाशी तसेच रेल्वे बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती जाणून घेणे सोयीचे ठरणार आहे.
