नव्याने सुरु झालेल्या क्लीअरन्स सिस्टमच्या चाचण्या सुरु, आता दोन दिवसाची प्रतिक्षा संपली
बँकिंग व्यवहारामध्ये चेक हा महत्वपुर्ण विषय असला तरी चेक क्लिअरिंगसाठी तब्बल दोन दिवसाचा कालावधी लागत असायचा परंतु यांबाबत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या वतीने शनिवार दि. 4 ऑक्टोंबर पासून चेक क्लिअरन्स सिस्टममध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून या करीता चाचणी प्रक्रीया सुुरु केली आहे. त्यामुळे या अंमलबजावणीमुळे चेक जमा केल्यानंतर अवघ्या काही तासातच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.
यापुर्वी असलेल्या क्लिअरन्स सिस्टममध्ये चेक क्लिअर होवून खात्यात पैसे जमा होण्यास दोन दिवसाचा कालावधी लागत होता. परंतु आता नव्याने सुरु झालेल्या क्लिअरिंग सिस्टमला सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट असे म्हणतात. एकदा आमलात आणल्यानंतर बँका काही तासात चेक स्कॅन करतील, सादर करतील आणि क्लिअर करतील हे काम बॅकींग वेळेत केले जाईल त्याची आजपासून बँकाच्या वतीने चाचणी सुरु केली आहे.
ही बातमी वाचा –KHAMGAON NEWS-कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार श्री मोठी देवी शांती उत्सव
चेक मिळाल्यानंतर चेक च्या तपासणी अंती चेक क्लिअरिंगच्या प्रोसेस करीता दिला जाणार आहे. अन्यथा तो चेक नाकारला जाईल. जर चेक ची रक्कम आणि खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास चेक बाऊन्स चार्जेस लागेल.
चेक देतांना आवश्यक रकमा बचत खात्यात ठेवावी.
चेक क्लिअरिंग बाबत एचडीएफसी, आयसीआयसीआय यासोबत अन्य खाजगी बँकंंाच्या वतीेने घोषणा केली आहे की 4 ऑक्टोंबर पासून चेक सेटलमेंट एकाच दिवशी होईल त्यामुळे बँकंाच्या वतीने चेक बाऊन्स रोखण्याच्या उद्देशाने खात्यात पुरेशी रक्कम ठेवण्याचा सल्ला ग्राहकांना दिला आहे.
या सुविधेमुळे चेक ची रक्कम त्याच दिवशी मिळणार
बँकेमध्ये चेक सकाळी जमा केल्यास त्याच दिवशी दुपारी वा संध्याकळी पैसे खात्यात जमा होती. हा बदल चेक ट्रंझेक्शनला गती देण्यासाठी आहे.
नव्याने सुरु झालेल्या सिस्टमची दोन टप्प्यामध्ये होणार अंमलबजावणी
पहिला टप्पा 4 ऑक्टांेबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. तरी या कालावधीत बँकांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुष्टी करावी लागेल.
दुसरा टप्पा- 3 जानेवारी 2026 पासून बँकांना फक्त 3 तासात प्रतिसाद द्यावा लागेल.
