प्रभाग क्र. 1 मध्ये शिवसेना पुन्हा चर्चेत!
शेगांव- शेगांव नगर पालिकेत नगरसेवक म्हणून दमदार नेतृत्व असलेले माजी नगरसेवक यावेळी प्रभाग क्र. 1 मधुन नगरसेवक पदाकरीता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावेळी निवडणुकीचा दांडगा अनुभव असणारे नेत्यांची इंट्री या वेळी प्रभाग क्र. 1 मध्ये चर्चेची ठरत आहे. नामदास परिवातील युवा असतांना विजय नामदास यांनी सुध्दा हा प्रभाग लढविला होता. पा
ठीशी कुठलाच अनुभव नसतांना एकनिष्ठा बाळगीत समाज पाठीशी राहिला असल्याचा इतिहास आहे. तर अविनाश दळवी यांनी नगर परिषद सभागृह गाजविल्याने यावेळी प्रभाग क्र. 1 मध्ये त्यांची खेळी नक्कीच दमदार ठरत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे सच्चे शिवसैनिक म्हणून अविनाश दळवी यांची भुमिका व युवा नेतृत्व असलेल्या मनिष नामदास यांच्या पत्नीच्या रुपाने असलेले उमेदवारी यावेळीच्या निवडणुकीत चर्चेची ठरू लागली आहे.
ही बातमी वाचा – प्रभागाच्या विकासासाठी समस्यामुक्त प्रभागासाठी भाजपाला मत द्या- आ.डाॅ.संजय कुटे
शिवसेनेचा या प्रभागावर अगोदरपासूनच प्रभाव आहे. सन 2016 मध्ये सतिश नामदास यांनी सुध्दा हा प्रभाग शिवसेनेच्या चिन्हावर लढविला त्यावेळी या परिसरातील समाज बांधवांनी दिलेली पाठींबाची शिदोरी एकनिष्ठेची असल्याचं मतपेटीच्या निकालातुन समोर आलं होतं. तरी अविनाश दळवी आणि नामदास परिवाराचा प्रभागातील दांडगा अनुभव यावेळी वेगळी रणनिती आखण्याच्या तयारी असल्याने प्रभागात चर्चा रंगल्या आहेत.
सत्ता असो वा नसो कामाच्या बाबतीत आणि समस्याच्या निराकरणासाठी आजही अविनाश दळवी यांच्यातील शिवसैनिक तडकन जागो होतो आणि लगेच आंदोलनाचा पवित्रा घेतो ही बाब शेगांवकरांनी चांगल्या पध्दतीने अनुभवली आहे हे विशेष. तर जिकंण्याच्या अनुषंगाने कुठल्याही तडजोडीशिवाय डिजीटल प्रचार यंत्रणा आणि विकासात्मक धोरणे असणारी जाहीरनाम्याची तयारी करण्यात येत असल्याचे वास्तव्य आता या निवडणुक प्रक्रीयेत अनुभवयास येत असल्याने प्रभागातील उमेदवारांमध्ये चर्चा रंगताहेत हे विशेष.
