आतापर्यंत आपण कधीही पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा व्यवसायिकांना वा किरकोळ विक्रेत्यांना आता पीएम स्वानिधी अंतर्गत पहिल्यांदाच 15 हजार रुपये कर्ज मिळणार आहे. आणि त्यासाठी सुध्दा कुठलीच हमी देण्याची गरज राहणार नाही. तर ज्यांनी या अगोदर 10 हजार रुपये कर्ज घेवून रितसर भरणा केला आहे. त्यांना आता दुसऱ्या टप्प्यात 20 हजार ऐवजी 25 हजार कर्जाकरीता अर्ज सादर करता येणार आहे. तरी डिसेंबर 2024 पर्यंत असलेल्या योजनेला आता शासनाच्या वतीने 2030 पर्यंत मुदत वाढ दिली असल्यामुळे व्यवसायिकांकरीता ही सुवर्ण संधी आहे. तरी यामध्ये डिजीटल युगाकरीता नाविन्यपुर्ण योजना सुध्दा राबविण्यात आल्या आहेत.
हमीशिवाय कर्ज- पीएम स्वानिधी कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पीएम स्वानिधी योजनेला 2030 पर्यंत मुदत वाढ
सुमारे 7332 कोटी रुपयांसह रस्त्यावरील विक्रेत्यासाठी (फेरीवाले) पंतप्रधान स्वनिधी योजनेला 31 मार्च 2030 पर्यंत मुदतवाढ केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना या पुढे 15 ते 50 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. या पुर्वीची योजना ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध होती. आता मुदत वाढीनंतर 50 लाख नव्या लाभार्थ्यांसह एकुण 1.15 कोटी लाभार्थी पर्यंत पीएम स्वानिधीचा लाभ पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री मंडळाची बैठक पार पडली. यावेळी प्रधानमंत्री स्ट्रिट वेंडर आत्म निर्भर निधीच्या ( पीएम स्वनिधी) पहिल्या हप्त्याची रक्कम 10 हजारावरुन वाढवून ती पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे. तर दुसरा हप्ता 20 हजारावरुन 25 हजार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तिसऱ्या हप्त्याची रक्कम 50 हजार एवढी कायम ठेवण्यात आली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहेे. वेळेवर कर्जाची परतफेड करणारे विक्रते युपीआय शी संबधीत रूपे क्रेडीट कार्डसाठी पात्र असतील या शिवाय डिजीटल कॅशबॅक इन्सेटीव्ह देखील रिटेल आणि होलसेल व्यवहारासाठी त्यांना मिळणार आहे. याशिवाय पीएम स्वनिधीच्या सदस्यांना 1600 रुपयांपर्यंत कॅशबँक देखील दिला जाणार आहे.
ही बातमी वाचा –आता व्यवसायिकांची दुकाने राहणार 24 तास खुली.. काय असणार नियमावली!
रितसर भरणा केला असल्यास त्यांना आता वाढीव कर्ज मिळविण्याकरीता अर्ज करता येणार आहे. तरी संबधित बँकेकडून कर्ज भरणा केलेला निलचा दाखला घेण्यात यावा.त्यानंतर ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्रक्रीया करुन घ्यावी तसेच बँक अधिकाऱ्यांनी नमूद केलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडण्यात यावी. तरी आता वाढीव कर्ज प्रकरणाकरीता अर्ज प्रक्रीया सुरु झालेली आहे. तरी याकरीता इंटरनेट सायबर कॅफे, पीएम स्वानिधी योजनेकरीता मार्गदर्शक केंद्रावरुन सविस्तर माहिती घेण्यात यावी.
किती मिळणार कर्ज, कसा करावा अर्ज, काय लागणार आवश्यक कागदपत्रे
पीएम स्वानिधी योजना ही केंद्र शासनाची असून रस्त्यावर व्यवसाय करणारे तसेच किरकोळ व्यवसायिकांकरीता कर्ज उपलब्ध करुन देणारी योजना असून व्यवसायाकरीता घेतलेले कर्ज एका वर्षात फेड केल्यास बिनव्याजी कर्ज मिळू शकते. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकच व्यक्ती घेवू शकतो.सदर कर्ज प्रकरणाकरीता कुणाचीही हमी घेण्याची गरज नाही. पहिले कर्ज रितसर भरल्यास वाढीव कर्ज घेण्यास व्यवसायिक पात्र ठरतात. पहिल्यांदा 10 हजाराचे कर्ज घेतल्यानंतर दुसऱ्यंादा 25 हजाराचे कर्ज घेता येणार तर तिसऱ्यांदा 50 हजाराचे कर्ज घेता येते. तसेच व्यवसायिकांसाठी 10 हजार रुपये खेळते भांडवल अत्यल्प व्याजदराने उपलब्ध आहे.
कर्ज घेण्याकरीता तो भारताचा नागरिक असावा. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना सुध्दा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.लहान व्यवसाय, कारागिर, दुरुस्तीची कामे करणारे सुध्दा या योजनेचा लाभ घेवू शकतात.
आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहे. तरी याकरीता शासनाच्या पीएम स्वानिधी या पोर्टलवर जावून 15 हजार, 25 हजार व 50 हजार करीता अर्ज करु शकता.
