journalist

अखेर त्या ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

पत्रकाराला गंभीर धमक्या, अश्लील शिवीगाळ प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकाऱ्याकडे

प्रतिनिधी :-
हिवरखेड येथील प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला वारंवार गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणे आणि अत्यंत आक्रमकपणे अश्लील शिवीगाळ प्रकरणी राजेश देशमुख या मुजोर ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्यासह विविध गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून थेट आयपीएस अधिकारी निखिल पाटील या प्रकरणाचा तपास करणार आहेत. अकोट-तेल्हारा उपविभागा अंतर्गत आणि हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत हा पहिलाच गुन्हा असल्याची चर्चा आहे.

 

अकोट हिवरखेड जळगाव जामोद राज्य मार्गावर राजेश देशमुख या ठेकेदाराने हिवरखेड आणि खंडाळा फाटा नजीक अश्या दोन पुलाचे काम घेतले होते. परंतु दिलेल्या कालावधीत त्याने पुलाचे काम पूर्ण केलेच नाही याउलट मुदत वाढ देऊन सुद्धा त्याला पुलाचे काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड नरक यातना भोगाव्या लागत होत्या. त्यासाठी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकाराला वारंवार अश्लील शिवीगाळ करणे, पुलाच्या साईटवर बोलावून पुलाच्या निकृष्ट कामाचे फोटो व्हिडिओ काढल्यास तसेच वृत्त प्रकाशित केलास हात, पाय तोडण्यासह पत्रकाराला त्याच्या संपूर्ण कुटुंबासह जिवे मारण्यासह, खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकीन,असे अत्यंत आक्रमकपणे धमकावले.

ही बातमी वाचा –फुले शाहू पेरियार आंबेडकर हे आमचे नायक तर खलनायक कोण हे देखिल ओळखावे – प्रा. आर. डी. शिंदे

शिवीगाळ केली. त्यामुळे पत्रकार व त्याचे कुटुंबीयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सदर पत्रकाराने ठेकेदार राजेश देशमुख यांच्याविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्याच्यावर आता पत्रकार संरक्षण कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्यामध्ये296, 351(2) BNS मध्ये. कलम 351(3) BNS व महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी) प्रतिबंध अधिनियम 2017 चे कलम 3 व 4 कलम यांचा समावेश आहे.

 

पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ठेकेदार राजेश देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आता या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी निखिल पाटील करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच हिवरखेड ठाणेदार गजानन राठोड, पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, श्रीराम जाधव यांच्यासह पोलीस स्टाफ सहकार्य करीत आहेत.

Scroll to Top