अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली असली तरी बाजारातील जीएसटीमुळे दिवाळीत स्वस्ताईचे वारे वाहत असले तरी दिवाळीत सुका मेवा नातेवाईंकाना भेट देतांना थोडा हात आखडताच घ्यावा लागणार आहे. आजच्या बाजारपेठेच्या मागणीच्या तुलनेत सुक्या मेव्याचा पुरवठा कमी असल्याने सुकामेव्याची दरात 10 ते 20 टक्कयांची वाढ झाली आहे.
काजु, मनुके वगळता इतर सुकामेवा हा परदेशातुन आयात करावा लागतो. मात्र या दिवाळीत करण्यात आलेल्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दरात वाढ झाली आहे.
ही बातमी वाचा –Crime News- ठकबाज माजी सैनिक गजाआड!
दिवाळीत गोड खाण्याबरोबरच काही लोक सुक्या मेव्याचा पर्याय निवडताना भेट देण्यासाठी सुक्या मेव्याला पंसती दिली जाते. त्यानुसार बाजारात या सुक्या मेव्याचे वेगवेगळ्या आकाराचे गिफ्ट पॅकेट उपलब्ध आहेत. मात्र सुका मेव्याचे दर वाढल्याने गिफ्टचे दरही वाढले आहेत. बाजारात आता काजु, बदाम, पिस्ता, मनुके, खारीक, अक्रोड यांचे दर गेल्यावर्षीच्या मानाने 10 ते 20 टक्क्यांनी वाढलेले आहेत.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
मिठाई ऐवजी सुकामेवा अन चॉकलेट्सला पंसती
दिवाळीनिमित्त गिफ्ट देण्यासाठी ड्रायफ्रुट आणि चॉकलेट हम्पार्सला पसंती सुकामेव्याचे बॉक्स उपलब्ध आहेत. चॉकलेट साधे चॉकलेट, सुकामेवा, डार्क चॉकलेट असे प्रकार उपलब्ध आहेत. तरी यावेळी सुकामेवा मागील वर्षापेक्षा 10 ते20 टक्के वाढीव दराने विकत घ्यावे लागत असल्याची प्रतिक्रीया नागरिकांकडून कळविली जात आहे.
सुकामेव्याचे दर (सरासरी १ किलो)
किरकोळ होलसेल
बदाम 800- 1400 730-1200
काजू 700-1500 750-1200
पिस्ता 1000-1200 800-1000
अाक्रोड 1000-2200 1000-2000
अंजीर 750-1400 650-1200
खारीक 250-400 250-300
जर्दाळु 600-900 550-800
चारोळी 800-1400 700-1200
मनुके 350-700 300-600
