डॉ. स्वाती वाकेकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उध्दव ठाकरेंच्या हस्ते उदघाटन

शेगांव- सद्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाला असून 4 नोव्हेंबर ला अर्ज माघार झाल्यामुळे विविध मतदार संघातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेकरीता जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी आज सकाळी श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींचे दर्शन घेतल्यानंतर स्थानिक शेगांव येथील जगदंबा चौक येथे जळगांव जामोद विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन केले.

यावेळी त्यांनी उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुचना केल्या की, सद्या राज्यात सत्ता परिवर्तनाची लाट आहे.

त्या अनुषंगाने महाविकास आघाडीला जनसामान्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असल्यामुळे यावेळी सत्तापरिवर्तनाकरीता महाविकास आघाडीचा प्रचार मोठ्या जोमाने करा. यावेळी महाविकास आघाडीच्या जळगांव जामोद विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार डॉ. स्वातीताई वाकेकर, काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले, शहराध्यक्ष किरणबाप्पु देशमुख, खामगांव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा सद्याचे उमेदवार दिलीपकुमार सानंदा, ज्ञानेश्वर पाटील, नरेंद्र खेडेकर, माजी आमदार कृष्णराव इंगळे, पांडुरंगदादा पाटील, अविनाश दळवी, दिनेश साळुंके, संगितराव भोंगळ. यांच्या प्रमुख उपस्थितीसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी तसेच शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

आज शेगांव शहरातील प्रचार कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत होते. शहर परिसरातील विविध प्रभागातुन विविध समाज घटकांतील अनेक पुरुष महीला मोठ्या संख्येेने आजच्या प्रचार कार्यालय उदघाटन सोहळ्याला मोठ्या संख्येेने उपस्थित हेे विशेष

Leave a Comment