शेगंाव- शेगांव नगर परिषद हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या या प्रभागातील जनता ही मुलभुत सुविधापासून समाविष्ट झाल्यापासून वंचित आहे. नागरीकांच्या समस्यांचे अनेक प्रश्न असतांना पोटनिवडणुकामध्ये निवडुन आलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी सुध्दा या नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत कानाडोळा केला असल्याने ना पक्षाचा ना संघटनेचा तर आता उमदेवार असावा तर आमच्या मनातला अशी आर्त हाक डॉ. राजेश बाठे यांच्या नावाने या प्रभागात सुुरु आहे.
ही बातमी वाचा –माजी नगरसेवकांच्या वाढीव मालमत्तेचे जनताच घेणार ऑडिट!
प्रभाग क्र.9 मध्ये वास्तव्यास असलेले नागरिक हे उच्चशिक्षीत असून शांततामय वातावरणात वास्तव्य करण्याचे माध्यमातुन अलिशान वास्तु उभारुन येथे वास्तव्यास आहेत. परंतु या प्रभागातील नागरिकांना स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडुन लाखो रुपयांचा कर भरणा करुनही कुठलीच सुविधा मिळत नसल्याने यावेळी कोणत्याही पक्षाला प्राधान्य न देता यावेळी जनसामान्यांच्या सुखदुःखात नेहमीच पुढाकार घेणारे या प्रभागातील रहिवासी डॉ. राजेश बाठे यांनी या प्रभागाचे नेतृत्व करावे अशी मागणी या रहिवाश्यांच्या वतीने होत आहे.
डॉ.राजेश बाठे हे अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवेत काम करीत असून परिसरासह गावातील एक प्रतिष्ठित नागरिक अशी त्यांची छबी आहे. शासकीय स्तरावरही त्यांची चांगली पकड असल्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने दमदार नेतृत्व म्हणून आतापासून या प्रभागातील जनता त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. त्यामुळे यावेळी प्रभाग क्र. 9 मधुन या परिसरातील नागरिकांनी पक्षापेक्षाही व्यक्तीला महत्व देत डॉ. राजेश बाठे यांना पसंती दिली आहे. तरी येणाऱ्या काळातील वाटचाली साठी मित्र परिवारांकडून शुभेच्छा सुध्दा दिल्या आहेत.
