शेगांव- डॉ.लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त जळगांव जामोद विधानसभा मतदार संघाचा जयंती समारोपीय सोहळ्याचे आयोजन शेगांव येथे दि. 7 सप्टंेबर रोजी करण्यात आले आहे.
डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीचा सोहळा संपुर्ण राज्यात मोठ्या उत्साहात पार पडीत आहे. त्या अनुषंगाने अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. राज्यातील विविध विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबविण्याचे आयोजन शासनाच्या वतीने तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातुन राबविण्यात आले होते.
ही बातमी वाचा – राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्या व्हायरल व्हिडीओची महसुल मंत्र्याकडून अशी पाठराखण
तरी दि. 7 सप्टेंबर 2025 रविवार रोजी सकाळी 11 वाजता जयंती समारोपीय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक ना. रामदास आठवले हे राहणार असून या कार्यक्रमाला ना. प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री, ना. आकाश फुंडकर, कामगार मंत्री, महाराष्ट्र शासन तसेच जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी महायुतीतील मित्र पक्षांच्या वतीने या जयंती समारोप मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी या प्रसंगी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
