भेसळयुक्त गोडीत विष मिसळणाऱ्यांना प्रशासनाने वेळेवर लगाम लावण्यची वेळ आली आहे

दिवाळीच्या गोडवा; भेसळीचा प्रकार वाढल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता!

आता संपुर्ण देशभरामध्ये मिठाई विक्रीतही भेसळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम हा मानवी आरोग्यावर झााल्याशिवाय राहत नाही.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

अाता दिवाळीचा सण म्हणजे मिठाई व विविध मिष्ठान्न हे बाजारात असलेल्या दुकानातुन सर्वांनाच आकर्षित करीत असतात. आणि त्यासाठी व्यवसायिक आता भेसळयुक्त पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर झाल्याशिवाय राहत नाही. यावर्षी बाजारात विक्रीस येणारा खवा,मलाई व मिठाईत भेसळ असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अन्न प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

 

नुकतेच नांदुरा येथील बाजारपेठेत मिठाईत असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे. बाजारात मिळणाऱ्या खव्याचा रंग, वास आणि चव नैसर्गिक नसून त्यात सिंथेटीक पदार्थ, वनस्पती तेल आणि कृत्रिम सुगंध मिळले असल्याचा संशय आहे. काही नागरिकांना अशा मिठाईचे सेवन केल्यामुळे पोटदुखी आणि उलट्याचे त्रास जाणवले असल्याची माहिती समोेर आली आहे.

ही बातमी वाचा – विवाहीतेच्या घरात चार अनोळखी घुसल्याने; परिसरातील नागरिकांमध्ये सुटला थरकाप

 

दिवाळीच्या धामधुमीमध्ये बाहेरुन मागविण्यात आलेल्या खव्याची गुणवत्ता तपासल्या शिवाय विक्रीस ठेवली जाते अशा तक्रारी आता नागरिकांकडून येत आहेत. त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील मिठाई दुकाने आणि दुग्ध व्यवसायांवर अचानक तपास मोहीम राबवावी.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

संबधित व्यवसायिकाकडून उत्पादित पदार्थाचे नमुने तपासून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे. दिवाळी हा आनंद आणि गोडवा आणि आरोग्य साजरा करण्याचा सण आहे. तरी सद्याच्या भेसळयुक्त गोडीत विष मिसळणाऱ्यांना प्रशासनाने वेळेवर लगाम लावण्यची वेळ आली आहे. अशी मागणी सुजान नागरिकांकडून होवू लागली आहे. जेणेकरुन या दिवाळीच्या गोडव्यात आनंदा साजरा व्हावा. आणि मिठाई व मिष्ठानांना भेसळीपासून मुक्तता मिळावी असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

Scroll to Top