celebrate diwali

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव साजरा — संस्कृती आणि एकात्मतेचा उज्ज्वल संदेश

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

बोंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पारंपरिक उत्साहात व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा दीपोत्सव आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा परिसर दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशाने उजळून निघाला होता, तर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी परिसराला सौंदर्य आणि संस्कृतीचा संगम प्राप्त करून दिला.

ही बातमी वाचा – भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल!

 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काकड सर, शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर, शाळा समिती अध्यक्ष प्रवीण इलामे, तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक विनायक इलामे, दत्ता इलामे, अजय अंदुरकर, वंदना इलामे, मनोरमा थारकर आणि संगीता अंदुरकर उपस्थित होते. ग्रामस्थ आणि पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

 

दीपोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरण, गाणी आणि कवितांच्या माध्यमातून दिवाळीचा संदेश मांडला. ‘अंधारातून प्रकाशाकडे’ हा आशय घेऊन साजऱ्या झालेल्या या सोहळ्याने शाळेतील बालकांना एकात्मता, संस्कार आणि आनंदाचा अनोखा अनुभव दिला.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षकवर्ग व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच उत्साहपूर्ण पद्धतीने केले. दिव्यांच्या झगमगाटात साजऱ्या झालेल्या या दीपोत्सवाने बोंडगाव परिसरात संस्कृतीचा सुवास दरवळवला.

Scroll to Top