जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जळगांव जामोद– आजच्या युगामध्ये पैसा मोठा झाला असल्यामुळे नितीमुल्ये ही ऱ्हास होत असल्याचे चित्र जळगांव जामोद येथील घटनेतुन समेार आले आहे.

आईच्या नावाने जमा असलेली  बॅकेतील रक्कम काढून घेण्यासाठी एका युवकाने आई जिवंत असतांना स्थानिक नगर परिषद कार्यालयाच्या जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयात आई मयत झाली असल्याची नोंद केल्याची माहिती समोर आली असल्याने खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी तक्रारकर्त्या  वृध्द कौशल्याबाई राजपुत  या शासकीय कार्यालयाचा उंबरा झिजवत असल्याची कबुली दिली आहे.

आई-मुलाच्या प्रेमाच्या आणि आपलेपणाचा दाखला देणारी आपली संस्कृती आणि नितीमुल्ये असली तरी पैश्याच्या मोहापायी तिचा मुलगा प्रेमकुमार राजपुत याने आईच्या नावाची मृत्यु झाल्याची नोंद करीत बँकेत असलेली तब्बल दहा लाख रुपयाची रक्कम लंपास केली असून तो आता फरार झाल्याचे उघड झाले आहे.

 

आरोपी मुलगा प्रेमकुमार राजपुत याने दि. 5 ऑक्टोंबर 2023 रोजी  आईच्या मृत्यु झाल्याची माहिती स्वयंघोषणा अर्जाव्दारे केली व सदर माहिती नगर परिषद, जळगांव जामोद च्या जन्म मृत्यु विभगाात नोंद केली. आणि संबधित अधिकाऱ्याने कुठलीची चौकशी न करता मृत्यु प्रमाणपत्र दिले. त्या मृत्युच्या दाखल्यावरुन बँकेतुन जमा असलेले दहा लाख रुपये  घेवू  फरार झाला आहे.

 

ही बातमी वाचा –  शरद पवार – संघर्षातुन समाधान शोधणारं  व्यक्तिमत्व

 

तरी या घटनेने खळबळ उडाली असून याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षेतेवर सर्वसामान्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारकर्ता वृध्द कौशल्याबाई राजपुत यांनी याबाबतची तक्रार देण्यासाठी व न्याय हक्कासाठी येथील पोलीस प्रशासनाकडे सुध्दा तक्रारी केल्या असल्यातरी त्यावर त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची तक्रार त्यांच्या वतीने होत आहे.

 

मृत्यु झाल्याची नोंद करण्याकरीता जन्म-मृत्यु नोंदणी विभागाचे निकष असतांनाही संबधित अधिकाऱ्यांकडून  या मृत्यु नोंदीबाबत कुठलीच पडताळणी झाली नसल्यामुळे आणि अधिकाऱ्यांची कर्तव्याबाबत असलेली दिरंगाई स्पष्ट होत आहे. ज्या मुलाने हे कृत्य केले आहे तो बँकेतील फिक्स डिपॉझीट असलेले दहा लाख रुपये घेवून फरार झाला असल्याने  या पिडीत महिलेला संबधित अधिकारी ती रक्कम देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे हे विशेष.

Scroll to Top