राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या घरातच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिगंणात उतरले असल्यामुळे भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आता राज्यातील महानगर पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आमदार व खासदारांच्या मुलांना तिकीट मिळणार नसल्याचा दावा केला आहे.
राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असून सत्ताकाळ नसतांना महाविकास आघाडीतील नेत्यांच्या घराणेशाहीवर ताशेरे ओढण्याचे काळ विरोधकांची भुमिका बजावितांना भाजपाने मोठ्या जाेरात केले असले तरी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपाच्या नेत्यांच्या घरातीलच उमेदवार हे नगराध्यक्ष पदाचे दावेदार होते.
ही बातमी वाचा –कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी
आणि त्यामुळे भाजपाच्या त्या विरोधावर आता पक्षातील कार्यकत्यांकडून खापर फोडल्या गेले असले तरी त्याचा आवाज पक्षाचा स्वाभिमान पाहता झाला नसला तरी याची चुणुक भाजपाच्या कार्यकारणीस झाली असल्याने महानगर पालिका निवडणुकीच्या रिंगणात आता आमदार, खासदार व मंत्री महोदयाच्या घरातील उमेदवाराला नगरसेवक पदाचे तिकीट नाकारले जाणार आहे. आणि ज्यांनी उमेदवारी दाखल केली त्यांना सुध्दा माघार घ्यावी लागणार असल्याची चर्चा आता प्रसारमाध्यमातुन चर्चिला जात असली तरी यावर उद्यापर्यंत काय अंमलबजावणी होते हा येणारा काळच सांगेल.
