पुरुषोत्तम बिलेवार पोलिसांच्या ताब्यात!
सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ११ बेरोजगारांची ३४.६० लाखांची फसवणूक
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कुही विभागातील पोलिसांनी बेरोजगार युवकांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या माजी सैनिकाला अखेर गजाआड केले आहे.
गिरफ्तार आरोपीचे नाव — पुरुषोत्तम ज्ञानदेव बिलेवार (वय ४२, रा. सैनिक कॉलनी, शेगाव, जि. बुलढाणा) असे आहे. तो स्वतःला माजी सैनिक म्हणून सांगत असे.
या आरोपीने “समर्थ करिअर अकॅडमी” नावाने संस्था, तसेच यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटद्वारे बेरोजगार तरुणांशी संपर्क साधला होता. तो रेल्वे, सेना, पोलीस आणि इतर सरकारी विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत होता.
या माध्यमातून त्याने एकूण ११ बेरोजगार युवकांकडून तब्बल ३४ लाख ६० हजार रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे
ही बातमी वाचा – दिवाळीच्या गोडवा; भेसळीचा प्रकार वाढल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता!
🔹 एका फिर्यादीने १५ सप्टेंबर २०२५ रोजी कुही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
🔹 तपासादरम्यान पोलिसांना आरोपीचे ठिकाण शेगाव येथे असल्याचे समजले.
🔹 नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के व उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलिसांनी शेगाव येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
🔹 आरोपीच्या घरातून पैसे मोजण्याची मशीन देखील जप्त करण्यात आली आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
तसेच बिलेवारच्या नावावर शेगाव येथे “समर्थ करिअर अकॅडमी” नावाचे प्रशिक्षण केंद्र आणि शेगाव खामगाव रोडवर “बहीरम हंडी” नावाचे हॉटेल असल्याचेही उघड झाले आहे.
सध्या आरोपीला १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
