महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणामध्ये सत्ताकेंद्रस्थानी असलेल्या आणि आज जनसमान्यातील काँग्रेसची छबी पुन्हा जनसामान्यात निर्माण करण्याच्या दृष्टीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भुमिका ही स्पष्ट असली तरी स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी विरोधकांची वज्रमुठ बांधण्यास अयशस्वी ठरली असल्याचे वास्तव्य आता राजकीय जाणकारांकडुन व्यक्त होवू लागलं आहे.
स्थानिक पातळीवरील मागील 9 ते 10 वर्षापासून स्थानिक पातळीवर असलेल्या भाजपाच्या कारकीर्दीत अन्यायाविरोधातील रोष हा जनतेच्या मनात खदखदत असतांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातुन उद्रेक होणार होण्याचा मार्गावर असल्याची परिस्थीती ही चालुन आलेली असतांना यावेळी होवू घातलेल्यानिवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर असलेला राष्ट्रीय असलेला काँग्रेस पक्ष आणि मताधिक्य जाेपासणाऱ्या पक्षाच्या माध्यमातुन योग्य आणि दमदार नेतृत्व देण्याची आवश्यकता यावेळेस शहरात निर्माण झाली होती.
शेगांव शहराच्या राजकारणात भाजपा सत्ताधारी असला तरी त्याच्या विरोधात असलेला काॅंग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष असून शेगांव शहरातील मताधिक्याचा आकडा पाहता हा महत्वपुर्ण पक्ष असतांना जनतेचा मताचा कल सुध्दा मोठ्या प्रमाणात असल्याचे मागील निवडणुकीच्या अनुकरणातुन समोर अाले आहे. काँग्रेस पक्षाने यावेळी महाविकास आघाडीतील घटक मित्र पक्ष तसेच विचारधारेशी जुळणारे इतर मित्र पक्षातील नेतृत्वांना सोबत घेवून भाजप सत्तेला विरोध करण्यासाठी एकजुट असलेली वज्रमुठ बांधणी करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये होती. परंतु काँग्रेसमधील स्थानिक नेतृत्वांना ती साधता आली नाही. इतर महाविकास आघाडीतील मित्र पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत असलेला हेकेकोर भाव भोवला असल्याचे वास्तव्य आता नागरिकांच्या ओठांवर पुटपुटत आहे.
ही बातमी वाचा –मंत्र्यांच्या नेतृत्वात अविरोध झालेली नगर पालिका न्यायालयात टिकेल का?
काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या युती घोषणेबाबत राज्यपातळीवरुन सकारात्मक प्रयत्न झाले असल्यावरही स्थानिक पातळीवर काँग्रेसला ते साधता आले नाही.असे जाणकारांचे मत आहेेेेेेेेे. महाविकास आघाडीचे मित्र पक्षातील स्थानिक नेत्यांना सन्मान आणि तडजोड करण्याची भुमिका, भाजपाकडुन दुखावलेल्या इतर मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची भली मोठी यादी यावेळी एकत्र करण्याकरीता काँग्रेस नेतृत्वाची भुमिका चुकल्याचे दिसून येंत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या मताधिकाऱ्याचा फायदा हा नक्कीच भाजपा सत्ताधाऱ्यांना मतविभाजनातुन झाल्याशिवाय राहणार नाही हे दिसून येत आहे.
तरी काँग्रेसची भुमिका स्पष्ट व निर्भीडपणाची न दिसल्याने इतर मित्र पक्ष यांनी एकला चलो ची भुमिका घेतली तर युवा मतदार सुध्दा भरकटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शेगांव शहरामध्ये यावेळी काँग्रेसचा पुढाकार आणि नेतृत्वाची इतरांना सोबत घेवून भुमिका जर महत्वाची ठरली असली तरी दुहेरी लढतीतुन भाजपाला बाजुला सारणे सहज शक्य होण्यासारखे होते.
आता विरोधातील मित्र पक्षाच्या एकला चलो च्या भुमिकेमुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होणार आणि त्याचा फायदा भाजपाला होणार हे निश्चीत उघड होत आहे.
बुलढाणा शहरात वंचित चे उच्चशिक्षीत उमेदवार यांनी काल माघार घेण्याच्या दिवशी घेतलेली भुमिका ही नक्कीच सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ आणणारी ठरली असून मताचे विभाजन टाळण्याकरीता व विचारधारेेशी जुळणाऱ्या पक्षांकडे मताचा कल वाढवा हा उद्देश सिध्द केल्याचे जाणकारांचे मत आहे. तर याची सुध्दा पुनरावृत्ती शेगांव शहरातील स्थानिक नेत्यांकडून होणे अपेक्षित होते. परंतु झाले उलटेच! त्याचा फायदा हा नक्कीच सत्ताधाऱ्यांना होणार असल्याचे वास्तव्य आहे.
तरी या शहरातील घडामोडीवर आधारीत आणि जनसामान्यांच्या व जाणकारांच्या चर्चेतुन समोर आलेला हा शब्द प्रपंच!
