माझं गाव माझी जबाबदारी
शेगांव- शेगांव शहराला अनेक दशकाची गणेश उत्सवाची परंपरा असून युवा पिढीच्या माध्यमातुन संस्कृतीचे जतन करण्याचे काम मोठ्या उत्साहात विविध मंडळे सातत्याने राबवित आहेत. आणि या गणेश उत्सवाच्या माध्यमातुन शेगांव शहराला चांगले राजकारणी आणि अनेक नेतृत्व दिला असल्याचा इतिहास आहे.
तरी शेगांव शहरात होणाऱ्या गणेश उत्सव हा विविध मंडळाच्या माध्यमातून साजरा होत असतो. आणि विविध मंडळे अनेक देखावे अाणि अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांच्या नाविन्यपुर्ण कामाकरीता त्यांना सन्मान मिळायला पाहिजे अशी संकल्पना नागरी हक्क सरंक्षण समितीचे संस्थापक किरणबाप्पु देशमुख यांनी राबवित गणेश उत्सव पुरस्काराचे आयोजन केले. प्रारंभीला हा पुरस्कार छोट्याश्या स्वरुपात जरी असला तरी या पुरस्काराकरीता प्रशासन तसेच विविध घटकातील तज्ञांच्या समिती तयार करुन शहरातील मंडळाचे निरीक्षण करीत पुरस्कार वितरणाची पध्दत नव्याने सुरु केली असल्यामुळे गणेश मंडळे यांनी सुध्दा आपल्या कार्यपध्दतीत बदल करीत नाविन्यपुर्ण तसेच समाजहिताचे उपक्रम गणेश उत्सवादरम्यान राबविण्यास सुरुवात केली आहे.
आज शेगांव येथे विश्राम भवन आयोजित पत्रकार परिषदेत शेगांव शहरातील विविध गणेश उत्सव मंडळाना प्रेरणा मिळून नाविन्यपुर्ण उपक्रम तसेच समाजहित जोपासणाऱ्या तसेच समाजाभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगताना या संकल्पेनेचे स्वरुप व्यापक व्हावे विविध विचारधारेच्या संघटनाच्या माध्यमातुन सकारात्मकतेसोबतच पुरस्काराचे स्वरुप सुध्दा दर्जेदार व्हावा.
या करीता प्रथम नागरी हक्क सरंक्षण समिती, मोतीबाग तालीम मंडळ व शहरातील विविध पतसंस्थांच्या माध्यमातुन या पुरस्काराचे नियोजन करण्यात येत असले तरी आता नव्याने या उपक्रमामध्ये पतांजलि समिती, युवा क्रांती संघटना, ग्रो ग्रीन आदी संघटनांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या सक्रियतेमुळे या पुरस्काराला भव्यता मिळाली असून विविध समितीच्या माध्यमातुन विविध मंडळाचे निरीक्षण करण्यात येणारे आहे. तरी येणाऱ्या काळात या संकल्पना अविरत राहुन विविध मंडळांना त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा हा पुरस्कार ठरावा यासोबतच संस्कृतीचे जतन करणे सुध्दा गरजेचे आहे. परंतु सामाजिक बांधिलकी, मानवी आरोग्य याकरीता मंडळांनी सुध्दा शिस्तबध्दता जोपासली पाहिजे याकरीता गणेश मंडळाना देणारा पुरस्कार हा नक्कीच प्रेरणादायी असा राहणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आजच्या पत्रकार परिषदेला सहभागी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
