जळगांव जामोद मतदार संघातील प्रचाराची वाढली चुरस, चर्चेला उधाण

शेगांव- जळगांव जामोद विधानसभा मतदार संघामध्ये यावेळी होणारी लढत सद्या महायुती व महाविकास आघाडी अशी जरी असली तरी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. प्रविण पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली असून या मतदार संघातील जातीय समिकरणे पाहता तसेच विविध मतदारांचा कल पाहता यावेळी होणारी निवडणुक ही चुरशीची ठरणार अाहे. प्रचारामध्ये धामधुम ही जोमात सुरु झाली आहे.

भाजपा महायुतीच्या वतीने दि. 4 नोव्हेंबरला मोठ्या दिमाखात सुरु केले असले तरी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्या स्वातीताई वाकेकर यांनी सुध्दा महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडुन प्रचाराला शुभारंभ केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे असलेले उमेदवार डॉ. प्रविण पाटील यांनी यावेळी मतदार संघातील जातीय समिकरणे विचारात घेता उमेदवारी दाखल केली असल्याने यावेळी सामाजिक पाठबळ वंचितचा मतदारांचा गट्ठा तसेच मतदार संघामध्ये वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम व सर्वसामान्यांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय उराशी बाळगून या मतदार संघामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतली आहे. तरी सद्या महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत रंगत असली तरी वंचित चे डॉ. प्रविण पाटील यांनी सुध्दा नियोजनबध्द प्रचारात आघाडी घेतल्याचे वातावरण हे मतदार संघात निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे.

तरी महायुतीच्या वतीने शेगांव शहरात सुरु केले प्रचार कार्यालय तर महाविकास आघाडीच्या स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटनाचा शुभारंभ हा शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विजयाचे पेढे वाटा असा संकल्प यावेळी त्यांनी वदवुन घेतला असल्याने महाविकास आघाढीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. तरी सद्या मतदार संघामध्ये वंचित आघाडीची एक प्रचार सभा वगळता महायुती व महाविकस आघाडीच्या कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची कुठलीच प्रचार सभा झाली नसली तरी राजकीय वातावरण हे मोठ्या प्रमाणात तापले असल्याचे चित्र मतदार संघामध्ये आहे.

तिन्ही पक्षांच्या वतीने लढतीचे वातावरण निर्माण करण्याकरीता कायकर्ते, पदाधिकारी यांचा पुढाकार असून सायंकाळी आणि दुपारी विविध कार्यालयामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा पहावयास मिळत आहेत. तरी जळगांव जामोद विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे. तरी सद्या राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असली तरी मतदार राजा यावेळी कोणती भुमिका घेणार याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे हे विशेष.

Leave a Comment