महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास मागील 4 वर्षाप्ाासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आता निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसापासून उत्सुकता असलेल्या या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत लवकरच होणार असून याबाबत नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत करण्यात आली असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यात कार्यरत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्ष तथा सचिवांना पत्र दिले आहे.
तरी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून दिलेल्या दि. 3 ऑक्टोंबर 2025 च्या पत्र क्र. एमसीओ-2025/प्र.क्र.409/नवि-14 नुसार ही तारीख निश्चीत केली अाहे
निवडणुक आयोगाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत ही जरी या अगोदर घोषित केली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबत तारीख घोषित करतांच राजकीय पक्षासोबतच अनेक दिवसापासुन प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांना सुखद धक्का लागला आहे. तरी प्राप्त पत्रानुसार ही नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत ही दि. 6 ऑक्टोंबर 2025 रोजी मुंबई येथे होणार आहे.
याबाबत असे की, नगर विकास विभागाकडून दिलेल्या पत्रानुसार राज्यभरातील एकुण 247 नगर परिषदा व 147 नगर पंचायती च्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चीतीसाठी आरक्षणाची सोडत साेमवार दि. 6/10/ 2025 रोजी परिषद सभागृह 6 वा मजला, मंत्रालय,मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा –दसऱ्यानंतर उतरलं सोनं.. काय आहेत आज सोन्याचे दर?
सुरक्षिततेच्या दृष्टीने मंत्रालयाच्या प्रवेशाची विचारात घेता आरक्षणाच्या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे दोन प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येत आहे. तरी अध्यक्ष व सचिव या दोन प्रतिनिधींनी शिफारस करुन आरक्षणाच्या सोडतीस हजर राहावे असे पत्र शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी- छापवाले यंाच्या सहीने प्रसिध्द करण्यात आले आहे.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
ईच्छुकांना लागली उत्सुकता
आजस्थितील राज्यातील बहुतंाश नगर पालिकेवर प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक अशी कुठलीच भुमिका न बजाविणारे अनेक स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी हे निवडणुकीच्या प्रतिक्षेत हाेते. नुकतेच प्रारुप प्रभाग रचनेच्या निश्चीतीनंतर आता नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची अनेकांना प्रतिक्षा लागुन राहीली होती. तरी आता कोणाला आरक्षण सुटणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
