ZP Buldhana

Buldhana News-जिल्हा परिषद आरक्षणानंतर लगेच नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा!

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

बुलडाणा-जिल्हा परिषदेच्या आरक्षणासोडतीच्या तारखेनंतर लगेच नगर विकास विभागाकडुन नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडतीची तारीख निश्चीत केली असून जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ही 13 ऑक्टोंबरला होणार असली तरी दि. 3ऑक्टोंबर 2025 ला नगरविकास विभागकडुुन नगराध्यक्ष पदाबाबतच्या आरक्षणाची सोडत ही 6 ऑक्टोंबर 2025 रेोजी मंत्रालयात होणार अाहेत. आणि त्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या अध्यक्ष व सचिवांना तसे पत्र जरी जारी केले असले तरी आता निवडणुक कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद निवडणुका अगोदर लागणार की, नगर परिषद व नगर पंचायतीचा निवडणुक कार्यक्रम अगोदर लागणार या चर्चेंना उधाण आले आहे.

 

ही बातमी वाचा Buldhana News- नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत!, नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत

दिवाळीनंतर राज्यभरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा फटाका फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान त्यापूर्वीच ८ ऑक्टोबरला अनुसूचित जमातीच्या जागांवरील आरक्षणाच्या प्रस्तावास विभागीय मान्यता देणार आहेत. त्यामुळे १३ ऑक्टोबरला अनुसूचित जमातीच्या महिलांच्या आरक्षणाबाबतचा निर्णय होईल, शिवाय नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांच्या आर आरक्षणाची सोडत देखील १३ ऑक्टोबरला होणार आहे.

जिल्हा परिषद गटांसाठीचे आरक्षण जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात तर पंचायत समिती गणांसाठीचे आरक्षण १३ ऑक्टोबरलाच तहसीलदारांच्या मार्गदर्शनात होणार आहे. १४ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करतील. १७ ऑक्टोबर पर्यंत आरक्षणावर हरकती घेता येणार आहेत. ३१ ऑक्टोबर पर्यंत विभागीय आयुक्त हरकती व सूचनांवर अंतिम निर्णय घेतील. ३ नोव्हेंबरला अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल. त्यामुळे ३ नोव्हेंबर नंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे..

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

निवडणुक आयोगाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत ही जरी या अगोदर घोषित केली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबत तारीख घोषित करतांच राजकीय पक्षासोबतच अनेक दिवसापासुन प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांना सुखद धक्का लागला आहे. तरी प्राप्त पत्रानुसार ही नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत ही दि. 6 ऑक्टोंबर 2025 रोजी मुंबई येथे होणार आहे.

Scroll to Top