Shegaon Nagar parishad

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु

शेगांव- शेगांव नगर परिषद च्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी त्यावर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासनाच्या वतीने दि. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट

तरी दि. 30 ऑगस्ट हा शनिवार तर 31 ऑगस्ट रोजी रविवार असल्यामुळे सदर कार्यालय बंद राहणार का ? असे अनेक प्रश्न तक्रारकर्त्यांच्या मनात उपस्थित होते. परंतु नगर परिषद कार्यालयातुन मिळालेल्या माहिती नुसार प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासकीय कार्यालय हे शनिवार व रविवार दि. 31 ऑगस्टला सुट्टी असतांना सुध्दा हरकती व सूचना स्विकारण्याकरीता सुरु राहणार असल्याची माहिती नगर पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

सुट्टीचा दिवस जरी असला तरी हरकती व सुचना करीता कार्यालय सुरु राहणार- मुख्याधिकारी न.प.शेगांव

शनिवार रविवार हा कार्यालयीन सुटीचा दिवस असल्यामुळे मुख्याधिकारी जयश्री बोराडे, काटकर यांच्यांशी भ्रमणध्वनी व्दारे संपर्क केला असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हरकती व सूचना नोंदविण्यासाठी आज आणि उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सुट्टीेचे दिवस असले तरी कार्यालय सुरु राहणार असल्याचे सांगितले. तरी हरकतदार आज आणि उद्या कार्यालयीन वेळेत आपल्या हरकती व सूचना नोंदवु शकतात. अशी माहिती दिली आहे.

Scroll to Top