पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन
“भारताचे यशस्वी व लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा शेगाव शहर , भारतीय जनता पार्टी, शेगाव शहर व तालुक्यातर्फे ‘नमो मॅरेथॉन’ या भव्य स्पर्धेचे आयोजन रविवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता स्वर्गीय गजानन दादा पाटील मार्केट यार्ड शेगाव येथे करण्यात आले आहे.
‘मी धावतो आत्मनिर्भर भारतासाठी’ या घोषवाक्यासह युवकांच्या क्रीडा व राष्ट्रभक्तीची ऊर्जा एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मॅरेथॉनमधून आपल्या तरुणाईला एक निरोगी, शिस्तबद्ध व आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रेरित करण्याचा उद्देश आहे.
ही बातमी वाचा –पैसा तुमच्या बापाचा नाही.. माज दाखवूू नको, असा कामकुचारपणा दाखवत असाल तर शेण थापा- आ.रोहीत पवार
स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक ₹११,००१/-, द्वितीय पारितोषिक ₹७,००१/- आणि तृतीय पारितोषिक ₹५,००१/- असे ठेवले असून, विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे.
रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्ड, खामगाव रोड, शेगाव येथे या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. शेगाव व परिसरातील सर्व युवक-युवतींनी या भव्य ‘नमो मॅरेथॉन’मध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, हीच विनंती.”