महाराष्ट्रामध्ये उच्च सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी व चारचाकी वाहनांना एचएसआरपी लावण्यात शासनाच्या वतीने चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली अाहे. ही मुदत वाढ ही 15 ऑगस्ट 2025 पर्यंत होती.
राज्यात जुन्या असलेल्या वाहनांना नव्याने एचएसआरपी प्लेट लावण्याबाबत खरोखरच मोठी बातमी असून परिवहन विभागाच्या वतीने ही मुदत वाढ दिल्याने लाखो वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीने चौथ्यांदा एचएसअारपी प्लेट लावण्याकरीता मुदतवाढ दिली आहे या अगोदर 15 अॉगस्टपर्यंत ही प्लेट लावण्याची मुदतवाढ दिली होती परंतु अद्यापही 70 टक्के वाहनधारकांनी अद्याप प्लेट च लावली नसल्याने कोणती कारवाई होणार याबाबत अनेकांच्या मनात धाकधुक आहे. तरी आता नव्याने दिलेल्या मुदतवाढीमुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेगांव ब्रेकींग-ऑनलाईन अमिषामुळे युवकांची झाली लाखोची फसवणुक
एचएसआरपी प्लेट बाबत राज्यात एकुण 20 टक्के वाहनधारकांनी प्लेट तयार करुन घेतली असून 10 टक्के वाहनधारकांनी नोंदणी केली आहे. तरी सुध्दा 70 टक्के वाहनधारकांनी कुठलीच भुमिका घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे.
तरी आज एचएसआरपी प्लेट बाबत चौथ्यांदा मुदत वाढ देत ही नोंदणीची तारीख 30 नोव्हेंबर 2025 देण्यात आली आहे. कारण आजवर परिवहन विभागाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार 20 टक्के वाहनधारकांनी नंबर प्लेट तयार करुन घेतली असली तरी 10 टक्के वाहनधारकांनी अंतिम टप्प्यात नोंदणी केली असली तरी राज्यात जुने असलेल्या वाहनांना एचएसआरपी प्लेट न बसविलेल्या वाहनांची संख्या तब्बल 70 टक्के असल्याने 15 ऑगस्टपर्यंत या वाहनांना प्लेट लावणे शक्य नसल्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
परिवहन विभागाकडून जनजागृती
परिवहन विभागाचे आयुक्त यांनी राज्यभरातील प्रादेशिक व उप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक बोलवून या बैठकीमध्ये एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जनजागृतीवर भर देण्याचे ठरविले आहे.
परंतु मुदत वाढ मिळाल्याने आता राज्यातील उर्वरित असलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे विशेष
तरी उर्वरित असलेल्या वाहनधारकांनी दिलेल्या मुदतीच्या आत प्लेट बसविण्याकरीता पुढाकार घेणे गरजेचे ठरते.
Registraion online- https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html

Comments are closed.