आपुलकी फुडस्,शेगांव- वाटचाल 7 व्या वर्षाकडे

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मागील 6 वर्षापुर्वी  अत्यल्प पैश्यात सुरु केलेला उपक्रम आज शेगांवकरांच्या प्रथम पसंतीला उतरला आहे.

व्यवसाय हा अत्यल्प पैश्यात उभारुन त्याला जोपासण्याचे काम पिंगळे परिवारातील प्रत्येक सदस्याने जोपासले आहे. माझी कल्पना असली तरी आमचे सहकारी तथा माझ्या परिवारातील माझे वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांची जोड आणि शेगांवकरांचा आमच्या सेवेप्रति असलेला विश्वास हा अविरत आमच्या पाठीशी असल्याने हा सेवाभाव अविरत सुरु आहे. हे विशेष आणि आजवर सेवेची संधी दिल्यामुळे हा उपक्रम नाविन्यपुर्ण वाटचालीस सर्वोतोपरी नावारुपाला येत आहे हे विशेष. तरी आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य होत आहे. तरी सर्वांचे आभार…

शेगांव शहरामध्ये अन्न सेवा व्यवसायात नव्या व्यवसायिंकानी उतरावं ही मनोमन कल्पना होती, आणि माझ्याकडे सल्ला मागणाऱ्या अनेक महिलांना मी वारंवार जेवणाचा व्यवसाय उत्तम व्यवसाय हाच सल्ला देत असलो तरी  अनेकांकडून नकार घंटा मिळाली.

सन 2019 च्या सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्या दिवशी चवीचं खाणार आणि आपुलकीने देणार या धर्तीवर आपुलकी फूडस्,शेगांव हा उपक्रम शेगांवात सुरु केला. व्यवसाय सुरु करण्याचा मानस इतकाच होता की, बिना भांडवली व्यवसाय आणि ग्राहकांच्या हिताची व गरज ओळखुन हा सुरु केलेला व्यवसाय आज सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या उपक्रमाकरीता अनेक सहकारी मित्रांकडून पाठिंबा मिळाला आणि शेगांवकरांनी माझ्या या उपक्रमाला प्रथम पसंती दिली त्यामुळे आजची सेवाभावाची भुमिका बजवितांना माझ्या घरातील सर्व सदस्य आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलीचाही सहभाग लागला. या उपक्रमासाठी कर्मचारी आणि किराणा साहित्य पुरविणारे निर्मळ भाऊ यांनी कधीही सकारात्मक भुमिका दिली. तर जेवणाकरीता नेहमी लागणारे दळण आणि त्यांची तत्परता, शेगांव शहरातील पुरातन असलेली पिठाची चक्कीचे संचालक रमेश चव्हाण यांच्याकडून  नेहमीच सहकार्य लाभले.

हे पण वाचा…मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली

 

तर या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीसाठी शेगांवकरांसोबत बाहेरगाव वरुन येणाऱ्या भाविकांची सहकार्याची भावना ही नक्कीच  आपलेपणाची राहिली आहे.

 

 

मी या उपक्रमाची सुरुवात झाली असली तरी माझ्या मार्गावर कोणत्या चुका आणि त्या सावरण्याकरीता आमचे मार्गदर्शक रविंद्र तायडे, आणि कल्पकता जोपासणारे निलेश घोंगे, उद्योजक युवराज देशमुख आदी मित्र परिवार यांचा नेहमीच महत्वपुर्ण योगदान राहीले आहे. आणि ग्राहकांचा आमचाप्रति असलेला विश्वास आज आम्ही अडी अडचणीवर मात करीत या व्यवसायाची वृध्दीकडे वाटचाल करण्याचा मनस्वी आनंद घेत आहेत. तरी येणाऱ्या काळात आपणा सर्वांचे सहकार्याच्या प्रतिक्षेत…

Scroll to Top